'सुजल्यावर कळतंय मारलंय कुठं' कोल्हापुरातल्या राजकीय बॅनरची जोरदार चर्चा

कोल्हापुरात सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बॅनरची चर्चा जोरदार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लावलेल्या पोस्टरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेला आहे.

Advertisement
Read Time: 3 mins
कोल्हापूर:

कोल्हापुरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लावण्यात आलेल्या एका बॅनरची जोरदार चर्चा आहे. 'सुजल्यावर कळतंय मारलय कुठे' असा मजकूर या बॅनरवर लिहिला आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर लावलेले हे पोस्टर आहे. कोल्हापुरातील एसटी स्टँड परिसरातील या पोस्टरनं अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कोल्हापुरात सध्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बॅनरची चर्चा जोरदार आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर लावलेल्या पोस्टरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलेला आहे. सुजल्यावर कळतंय लागलय कुठे अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर आहे. कोल्हापुरातील एसटी स्टँड परिसरातील एका पादचारी पुलावर हे बॅनर लावण्यात आलेला आहे. या बॅनरमुळे आता जिल्ह्यात कोल्हापुरकरांमध्ये राजकीय चर्चा रंगल्याचे पाहायला मिळतंय.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

राष्ट्रवादीतील बंडखोरीनंतर कोल्हापुरातील नेते मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार राजेश पाटील यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आणि शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांच्या पाठीशी हे दोन्ही नेते राहिले. मात्र महाविकास आघाडीचे नेते नवे खासदार शाहू महाराज यांचा या निवडणुकीत विजय झाला. या निवडणुकीत कागलसह, राधानगरी, चंदगड, आजरा या तालुक्यात शाहू महाराज यांना चांगलं मतदान झालं. अनेक नेते संजय मंडलिक यांच्या पाठीशी होते. मात्र तरीही काही तालुक्यांमध्ये त्यांना मताधिक्य मिळालं नाही. निवडणूक निकाल लागल्यानंतर तीन दिवसांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लावलेल्या  या बॅनरमुळे उपरोधिकपणे संदेश देत असल्याचं पाहायला मिळालं.

हेही वाचा -  पंकजा मुंडेंच्या पराभवाचा धक्का, कार्यकर्त्यानं घेतला टोकाचा निर्णय

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने एका अपक्ष उमेदवारासह 31 जागां जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला मिळालेल्या विजयामध्ये सर्व पक्षांचा वाटा मोलाचा ठरला आहे. आता या विजयात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते किंगमेकर असल्याचं म्हटलं जात आहे. शिरूर माढा बारामती अशा अनेक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटालाला चांगला विजय मिळाला आहे. या विजयानंतर अजित पवार गटातील काही नेते शरद पवार यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चा रंगल्या. 

हेही वाचा -  राणे भिडले, गोगावलेंनी ठणकावले, निलेश यांची भाषा बदलली, आता म्हणतात...

बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी विजय मिळवल्यानंतर अजित पवार गटातील काही आमदारांनी त्यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्याचं पाहायला मिळालं. यानंतर शरद पवार यांच्या संपर्कात अनेक आमदार असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये कोण कोण सामील होणार याचा अंदाज अनेक ठिकाणी लावण्यात येत आहे. तत्पूर्वी कोल्हापुरात लावलेल्या या बॅनरमुळे आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट नेमकं काय सांगू पाहतोय याच्या अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.

Advertisement

हेही वाचा -  मोठा गौप्यस्फोट! प्रतिभा धानोरकरांचा 'लाख' मोलाचा विजय, पडद्यामागून कोणाची मदत?

विधानसभा निवडणुकीपूर्वी नेमक्या काय काय राजकीय घडामोडी घडतील याकडे आता अनेकांचे लक्ष असणार आहे. कोल्हापुरातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा कोण उमेदवार असेल का असावा ही प्रश्न आता अनेकांच्या मनात उपस्थित झालाय. कोल्हापूरच्या एसटी स्टँड परिसरात लावलेल्या या बॅनरमुळं तुतारी नेमकं काय संदेश देते हे पहावं लागणार आहे.

Advertisement