पुणे तिथे काय उणे! प्रेमी युगुलांसाठी स्वतंत्र बाग, ही मागणी का जोर धरते?

प्रेमात पडलेल्या माणसाला सगळं जग सुंदर दिसतं असं म्हणतात. पण खरंच तसं आहे का? कारण प्रेमी युगुलांकडे प्रेम करण्यासाठी हल्ली हक्काचं ठिकाणच राहिलेलं नाही.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

राहुल कुलकर्णी

पुण्यामध्ये शंभरहून अधिक बागा आहेत. त्यापैकी 15 टक्के म्हणजे किमान 15 बागा जोडप्यांसाठी आरक्षित ठेवाव्यात. पिंपरी चिंचवडमध्ये सुद्धा विभागनिहाय किमान 15 बागा आरक्षित असाव्यात अशी पुण्यातल्या तरुणांची मागणी आहे. अशी आरक्षित बाग का गरजेची आहे, याची अनेक उदाहरण ही मुलं देत आहेत. कुठलेही जोडपे एकत्रित फिरताना दिसलं की समाजाचे अनेक घटक त्यांच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतात. काही घटना अशा घडलेल्या आहेत की काही मुलींना अतिप्रसंगाला सामोरे जावे लागलं आहे. काही जोडप्यांचे व्हिडिओ फोटो काढून हुल्लडबाजांनी पालकांना दाखवण्याचे धमक्या दिल्या आहेत. अशावेळी आम्ही प्रेमिकांनी कुठे जायचं असा या तरुणांचा सवाल आहे 

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रेमात पडलेल्या माणसाला सगळं जग सुंदर दिसतं असं म्हणतात. पण खरंच तसं आहे का? कारण प्रेमी युगुलांकडे प्रेम करण्यासाठी हल्ली हक्काचं ठिकाणच राहिलेलं नाही. अनेकदा प्रेमी जोडप्यांना विनाकारण त्रास दिला जातो. अनेक शहरात प्रेमी जोडप्यांसोबत गैरप्रकारही होतात. अशावेळी प्रेमी जोडप्यांच्या हक्कांसाठी कोणीही पुढे येत नाही. पण प्रेमी जोडप्यांना एक हक्काची जागा मिळावी म्हणून राईट टू लव्ह ही संघटना पुढे आलीय. नाना नानी पार्क असतं. चिल्ड्रन्स पार्क असतं. मग कपल्ससाठी स्वतंत्र पार्क का नको असा सवाल या संघटनेने केलाय. 

ट्रेंडिंग बातमी -  छ. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

खरंतर प्रेमात पडलेल्या मंडळींच्या सुरक्षेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकारने तसं परिपत्रक काढून प्रेमी जोडप्यांच्या संरक्षणाची जबाबदारीही स्वीकारलीय. त्यानुसार शासनाकडून प्रत्येक जिल्ह्यात एका समितीची रचना केली जाणार आहे. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील.त्यानंतर महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त जिल्हा समाज कल्याण अधिकारी आणि  महिला व बालविकास अधिकारी असे सदस्य त्यात असतील. ही समिती आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या सुरक्षेची दक्षता घेईल.आवश्यकता असल्यास जोडप्यांसाठी सुरक्षागृहाची सोय ही करतील.

( नक्की वाचा : सलमान खानच्या घरावर गोळी चालवणारा 'मामा' कोण? मुंबई पोलिसांसमोर नवी डोकेदुखी )

आता राज्य सरकार प्रेमी जोडप्यांचा एवढा विचार करतच आहे. तर सरकारने प्रेमी जोडप्यांवर थोड्या अजुन प्रेमाचा वर्षाव करावा अशी अपेक्षा केली जात आहे. या जोडप्यांना प्रेमाचे क्षण अनुभवता यावेत म्हणून पुण्यातील गार्डन आरक्षित करण्याची मागणी केली जात आहे. प्रिय व्यक्तिसोबत निवांत वेळ घालवण्यासाठी एकांत हवा असतो. पण पुण्यात वाढलेली गजबज पाहता हे शक्य होत नाही. प्रेमी युगुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी राईट टू लव्ह संघटना प्रयत्न करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश कधी मिळणार याकडे अनेक प्रेमी जोडप्यांचं लक्ष लागलं आहे.  

Advertisement