जाहिरात
This Article is From Aug 02, 2024

छ. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

राज्य सरकारने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव असं नामांतर केल्यानंतर काही ठिकाणांहून याला विरोध करण्यात आला होता.

छ. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?
नवी दिल्ली:

छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव (Chhatrapati Sambhajinagar and Dharashiv) नामांतर प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे. या नामांतर प्रकरणातील याचिका फेटाळण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरप्रकरणी हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.  

नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने राज्याला दिलेला आहे. याशिवाय नाव बदललं की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात अशी परिस्थिती असते,  असं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने नोंदवलं आहे. 

नक्की वाचा - NEET-UG 2024 पेपरफुटी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

राज्य सरकारने औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशिव नामांतर केल्यानंतर काही ठिकाणांहून याला विरोध करण्यात आला होता. या प्रकरणात काहींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाकडून ही याचिका रद्द करण्यात आली होती.  मात्र यानंतर याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावलं. आज त्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानेही नामांतर प्रकरणातील याचिका फेटाळली आहे.