राज्यात पुढील दोन-तीन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यात बरसणार?

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

राज्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातल्या सर्वच भागात पाऊस बरसणार आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात चांगला पाऊस होईल असा अंदाज आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने थोडी उसंत घेतली आहे. मात्र आता तो पुन्हा सक्रीय होईल.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात  पावसाचा जोर वाढणार असल्याचं भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. त्याच बरोबर  मुंबईतही  पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. पुढील 48 तासात मुंबईत जोरदार पाऊस होऊ शकतो. 4 ऑगस्टला मुंबई, ठाण्यासह उपनगरांमध्ये अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  लाडकी बहीण योजनेला ब्रेक लागणार? उच्च न्यायालयात याचिका, मागणी काय?

मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यांवर अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात देखील पुढील दोन दिवस चांगल्या पावसाचा अंदाज आहे. प्रामुख्याने घाट परिसरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नाशिक आणि कोल्हापुरातील घाट माथ्यांवर मुसळधार पाऊस पडेल. या भागात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. घाट परिसरांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक, पुणे, सातारा आणि कोल्हापुरातील शहरी भागांमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. सोबतच, अहमदनगर, जळगाव, नंदुरबार आणि धुळ्यात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसाची शक्यता आहे. 

ट्रेंडिंग बातमी - पुणे तिथे काय उणे! प्रेमी युगुलांसाठी स्वतंत्र बाग, ही मागणी का जोर धरते?

मराठवाड्यात सर्वत्र विजांच्या कडकडाटासह चांगल्या पावसाचा अंदाज आहे. 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तिन्ही जिल्ह्यांमध्ये 40-50 किमी वेगाने वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. लातूर आणि उस्मानाबाद सोडता मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement