खुर्ची एक आयुक्त दोन, 'या' महापालिकेत सावळागोंधळ

आयुक्त पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिल्याने दोन आयुक्तांमध्ये कार्यालयात वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

Advertisement
Read Time: 2 mins
इचलकरंजी:

विशाल पुजारी

इचलकरंजी महापालिकेत प्रशासकीय गोंधळ पाहायला मिळत आहे. एकाच दिवशी कार्यालयात दोन आयुक्त बसल्याने सर्वांची भंबेरी उडाली. राजकारणातील खुर्चीनंतर प्रशासकीय खुर्चीचा अजब खेळ पाहायला मिळाला. ओम प्रकाश दिवटे आणि पल्लवी पाटील अशी या दोन आयुक्तांची नावे आहेत. आयुक्त पदाच्या नियुक्तीला स्थगिती दिल्याने दोन आयुक्तांमध्ये कार्यालयात वाद झाल्याचे चित्र पाहायला मिळालं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इचलकरंजी महापालिकेचे आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची बदली झालेली होती. त्यांच्या जागी पल्लवी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र ओमप्रकाश दिवटे यांनी ही बदली रद्द करण्यासाठी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरण बोर्ड, मुंबई येथे धाव घेतली होती. त्यानंतर दिवटे यांच्या बदलीला स्थगिती मिळाली. ओमप्रकाश दिवटे हे शुक्रवारी 14 जून रोजी सकाळी आयुक्त पदाचा कार्यभार घेण्यासाठी महापालिकेत दाखल झाले. तत्पूर्वी पल्लवी पाटील यांनी कार्यालयात पदभर स्वीकारला होता. 

ट्रेंडिंग बातमी -  महायुतीत राष्ट्रवादी नाराज? कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीला नेत्यांची दांडी

त्यावेळी पाटील यांना दिवटे यांनी आपल्या बदलीला स्थगिती मिळाली असल्याचे सांगितले. मला कार्यभार स्वीकारण्याच्या आदेश देखील देण्यात आल्याचे दिवटे यांनी पाटील यांना सांगितले. मात्र याच दरम्यान या दोन्ही आयुक्तांमध्ये सावळा गोंधळ पाहायला मिळाला. कार्यालयातच दोघांमध्ये वादावाद देखील सुरू झाली. दरम्यान यानंतर वकिलांशी चर्चा देखील सुरू झाली.आपणाला कार्यभार घेण्याचे आदेश आहेत असे दिवटे यांनी सांगितले. त्यावर आयुक्त पल्लवी पाटील यांनी आपल्याकडे आयुक्तपदाचा कार्यभार आहे. कार्यभार सोडण्याविषयी आपल्याला कोणतेही आदेश नाहीत असे उत्तर त्यांनी दिले. 

ट्रेंडिंग बातमी - मनासारखा राजा आणि राजासारखं मन ! तेजस्विनी पंडीतची इन्स्टापोस्ट चर्चेत

त्यानंतर दोन्ही अधिकारी एकाच केबिनमध्ये आयुक्त म्हणून कामकाज करू लागले. आयुक्त म्हणून दिवटे ही आपल्या मतावर ठाम आणि पल्लवी पाटील ही आपल्या मतावर ठाम, यामुळे नेमके आयुक्त कोण? अशी चर्चा ही महापालिकेत रंगली. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मध्ये हा विषय चर्चेचा झाला. एकाच केबिनमध्ये आयुक्त म्हणून कामकाज करत असलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांचा फोटो ही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे इचलकरंजी शहरातही खुमासदार चर्चा रंगली.

Advertisement