CCTV Video: पालघरमध्ये खळबळ! ज्वेलर्सवर गोळीबार, बंदूक खाली पडली तरीही सोनं चोरलं, मनी हाईस्टचा खतरनाक प्रकार

Robbery At Palghar Boisar Jwelers Video : पालघरच्या बोईसर येथील गणेशनगर परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी चतुर्भुज ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार केला.

जाहिरात
Read Time: 2 mins
Palghar Gold Robbery Video
मुंबई:

मनोज सातवी, प्रतिनिधी

Robbery At Palghar Boisar Jwelers Video : पालघरच्या बोईसर येथील गणेशनगर परिसरात भरदिवसा गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन अज्ञात चोरट्यांनी चतुर्भुज ज्वेलर्सच्या दुकानावर गोळीबार करून दागिने लंपास केले. दुकान मालकाला बंदुकीचा धाक दाखवून चोरट्यांनी या ज्वेलर्समध्ये दरोडा टाकला. दुकान मालकासोबत झालेल्या झटापटीत चोरट्यांनी दोन राउंड फायर केले. पण सुदैवाने ज्वेलर्स मालकाला गोळी न लागल्याने त्यांचा जीव वाचला. चोरट्यांनी घाईगडबडीत रिव्हॉल्व्हर घटनास्थळीच फेकली आणि ते पसार झाले. दरम्यान, चोरीच्या घटनेचा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे.

चोरीच्या घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी रिव्हॉल्व्हर जप्त करून परिसरात नाकाबंदी केली आहे. पोलिसांनी या घटनेचा सर्व बाजूंनी तपास सुरु केला आहे, अशी माहिती पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी दिली आहे. दरम्यान, घटनास्थळी गोंधळ उडाल्यामुळे चोरटे दुचाकीवरून पसार होत असताना रिव्हॉल्व्हर टाकून पळाले.

गोळीबार केल्यानंतर चोरटे पळाले, पण नंतर जे घडलं..

गोळीबारानंतर पळणाऱ्या चोरट्यांचा सीसीटीव्ही फुटेज एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागले असून, त्यात दोघे आरोपी नदुचाकीवरून निघून जात असल्याचे स्पष्ट दिसते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे काही नागरिकही लागल्याचे दिसून येत आहे. याच घाईगडबडीत त्यांच्या हातातून बंदूक खाली पडली. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी रिव्हॉल्व्हर जप्त करून परिसरात नाकाबंदी केली असून, चोरट्यांचा शोध सुरू आहे.

नक्की वाचा >> दोघांनी केला सुशांत सिंह राजपूतचा मर्डर? बहिणीने केला खळबळजनक खुलासा, रिया चक्रवर्तीही निशाण्यावर..

पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाने तपासाची सुत्रे फिरवली

या प्रकरणी “चोरट्यांनी दरोड्याचा प्रयत्न करताना गोळीबार केला असला, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनास्थळी सापडलेले शस्त्र जप्त करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी तपास जलदगतीने सुरू केला आहे, डिटेक्शन टीम, स्थानिक क्राईम ब्रँचची टीम वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आल्या असून आरोपींचा माग काढला जात आहे.

Advertisement

नक्की वाचा >> Anaya Bangar : गोलंदाजांची आता खैर नाही! अनाया बांगर या नावाने उतरणार क्रिकेटच्या मैदानात, GYM चा व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

फॉरेन्सिक ची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली असून लवकरच आरोपींना अटक केलं जाईल असा विश्वास पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे बोईसर परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, गुन्हेगारी घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी शहरात गस्त आणि सुरक्षा वाढविण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

Advertisement

Topics mentioned in this article