जाहिरात

गोलंदाजांची आता खैर नाही! अनाया बांगर या नावाने उतरणार क्रिकेटच्या मैदानात, GYM चा व्हिडीओ शेअर करत म्हणाली..

Anaya Bangar Gym Workout Video Viral : भारताचे माजी ऑलराऊंडर संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. जेंडर चेंज केल्यापासून अनाया प्रकाशझोतात आली आहे. अशातच अनायाच्या नव्या व्हिडीओनं धुमाकूळ घातलाय.

गोलंदाजांची आता खैर नाही! अनाया बांगर या नावाने  उतरणार क्रिकेटच्या मैदानात, GYM चा व्हिडीओ शेअर करत म्हणाली..
Anaya Bangar Latest Viral Video
मुंबई:

Anaya Bangar Gym Workout Video Viral : भारताचे माजी ऑलराऊंडर संजय बांगर यांची मुलगी अनाया बांगर मागील काही दिवसांपासून खूप चर्चेत आहे. जेंडर चेंज केल्यापासून अनाया प्रकाशझोतात आली आहे. अनाया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. आता अनायाने आणखी एक पोस्ट शेअर करत क्रिकेटबाबत मोठी अपडेट दिली आहे. नवीन पोस्टमध्ये अनाया बांगरने तिच्या फ्यूचर प्लॅनिंगबाबत सांगितलं आहे. अनायाची इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल झाली असून चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अनाया काही दिवसांपूर्वीच रिएलिटी शो राईज अँड फॉलमध्ये झळकळी होती.

काय आहे अनाया बांगरची फ्यूचर प्लॅनिंग?

अनाया बांगरने नुकतच इन्स्टाग्रामवर भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये तिने तिच्या जीवनाबाबतचा एक नवीन चॅप्टर सुरु केला आहे. अनायाने म्हटलंय की, तिने तीन महिन्यांपूर्वी सर्जरी केली होती. आता ती पूर्णपणे ठिक झाली आहे. तिने म्हटलंय की, तिच्या सर्जरीला आता तीन महिने पूर्ण झाले आहेत आणि आता मी पूर्णपणे ठीक आहे. मी ठरवलं आहे की, मी क्रिकेटच्या मैदानात परत येणार. पण आता आर्यन नाही..अनाया म्हणून..अनाया बांगरने पुढं म्हटलं, हा प्रवास सोपा नव्हता. पण कुटुंब आणि चाहत्यांच्या प्रेमामुळे ती मजबूत झाली. मला माझ्या चाहत्यांचं मनापासून आभार मानायचे आहेत. अनायाचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी तिच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.

इथे पाहा अनाया बांगरचा वर्कआऊटचा व्हिडीओ

नक्की वाचा >> 

ट्रान्सजेंडर खेळाडूंसाठी आशेचा किरण

याआधी एका व्हिडीओत अनाया बांगरने तिच्या थेरेपीच्या संघर्षाबाबत मोठी खुलासा केला होता. अनायाने एका पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तिने एक वर्षापर्यंत हार्मोन रिप्लेसमेंट थेरेपी घेतली. त्यानंतर मॅनचेस्टर मेट्रोपॉलिटन यूनिव्हरसिटीसोबत मिळून अनेक टेस्ट केल्या. यामध्ये मसल स्ट्रेंथ, सहनशक्ती, ग्लूकोज आणि ऑक्सिजन प्रमाणाची तुलना महिला खेळाडूंशी केली गेली. तिने म्हटलं की, या रिझल्टमुळे हे सिद्ध झालं की, ती महिला क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे.

नक्की वाचा >> स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये VVPAT चा वापर? राज्य निवडणूक आयोगाने दिली सर्वात महत्त्वाची माहिती

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com