अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी
Pune ILS Law College News Today : पुण्यातील आयएलएस लॉ कॉलेज पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. महाविद्यालयाकडून बेकायदेशीरपणे आकारण्यात आलेली परत मिळवण्यासाठी शेकडो विद्यार्थ्यांनी थेट महाविद्यालय तसेच उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाकडे अर्ज दाखल केले आहेत.या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा संताप व्यक्त होत आहे.
विद्यार्थ्यांचा आरोप आहे की,प्रवेश प्रक्रियेदरम्यान महाविद्यालयाने शासनाने निश्चित केलेल्या फी पेक्षा अधिक रक्कम विविध शीर्षकाखाली आकारली.काही विद्यार्थ्यांकडून “डेव्हलपमेंट फी”,“इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस” अशा नावाखाली अतिरिक्त पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.दरम्यान,प्रवेश रद्द किंवा स्थलांतर घेतलेल्या विद्यार्थ्यांना नियमांनुसार फी परत मिळणे अपेक्षित असताना,ती रक्कम परत देण्यात टाळाटाळ केली जात असल्याचीही तक्रार आहे.
विद्यार्थ्यांची भूमिका काय?
शेकडो विद्यार्थ्यांनी लेखी तक्रारी दाखल केल्या आहेत. फी परतावा न मिळाल्यास कायदेशीर लढा देण्याचा इशारा देण्यात आला आहे. काही विद्यार्थ्यांनी सामूहिक अर्ज करून कारवाईची मागणी केली आहे. विद्यार्थ्यांनी उच्च व तंत्रशिक्षण संचालनालयाकडे तक्रारी सादर करत,फी संरचनेची चौकशी करण्याची मागणी केली. बेकायदेशीर वसुली परत करण्याचे आदेश देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
नक्की वाचा >> Akola News: अकोल्यात खळबळ! राजापेठ पोलीस निरीक्षकावर विनभंगाचा गंभीर आरोप, पत्नीला रस्त्यावर केली मारहाण
आयएलएस लॉ कॉलेज हे राज्यातील नामांकित विधी महाविद्यालय असले तरी,फी संरचना आणि प्रवेश प्रक्रियेवरून यापूर्वीही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. काही वर्षांपूर्वीही अतिरिक्त फी आकारल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.विद्यार्थ्यांना फी परताव्यात विलंब होत असल्याचे प्रकार घडले होते.शिक्षण शुल्क नियामक प्राधिकरणाच्या (FRA) नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
नक्की वाचा >> Pune News मेट्रोमोनियलवर फेक प्रोफाइल, महिलेकडे केली 'ती' मागणी, अलिबागच्या आदर्श म्हात्रेनं केलं मोठं कांड
सध्या हा विषय गंभीर बनला असून उच्च शिक्षण संचालनालयाने या प्रकरणाची दखल घेण्याची शक्यता आहे.चौकशी आदेश दिल्यास महाविद्यालयावर आर्थिक दंड किंवा इतर प्रशासकीय कारवाई होऊ शकते.दरम्यान,विद्यार्थ्यांनी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.