Dombivli News: जीवाभावाच्या 'रविदादा'साठी हजारो बहिणींची गर्दी! डोंबिवलीत रक्षाबंधनाला कौटुंबिक सोहळ्याचा रंग

Ravindra Chavan: भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात हजारो भगिनींनी एकत्र येत रक्षाबंधन साजरे केले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Ravindra Chavan: या सोहळ्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना रविंद्र चव्हाण भावूक झाले.
डोंबिवली:


Ravindra Chavan: भावा-बहिणीच्या पवित्र नात्याचा आणि अथांग विश्वासाचा रक्षाबंधनाचा सोहळा कल्याण-डोंबिवलीच्या परिसरात मोठ्या उत्साहात पार पडला. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांच्या जनसंपर्क कार्यालयात हजारो भगिनींनी एकत्र येत रक्षाबंधन साजरे केले. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक भगिनीने आपल्या लाडक्या 'रविदादा'ला राखी बांधत जिव्हाळ्याचे नाते अधिक घट्ट केले.

मायेच्या धाग्याने फुलले कौटुंबिक वातावरण

 कल्याण  डोंबिवलीतील विविध ठिकाणी रक्षाबंधनाचे विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. सकाळी स्वातंत्र्यवीर सावरकर चौक तर दुपारी सम्राट चौक येथील जनसंपर्क कार्यालयात महिलांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. सर्वसामान्य महिलांपासून ते शालेय व महाविद्यालयीन तरुणींपर्यंत सर्वांनीच अत्यंत प्रेमाने रविंद्र चव्हाण यांच्या मनगटावर संरक्षणाचा धागा बांधला. या संपूर्ण सोहळ्यात संपूर्ण परिसराला एका मोठ्या कुटुंबाचे रूप आले होते.

सैन्य भरतीतील तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग

या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते डोंबिवलीकर न्यू फोर्स अकॅडमीतील तरुणी. पोलीस आणि सैन्य दलात भरती होण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या या मुलींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रवींद्र चव्हाण यांना राखी बांधली. देशाच्या रक्षणासाठी सज्ज होणाऱ्या या भावी रणरागिणींच्या सहभागाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

Advertisement

चिमुकल्या हातांची राखी मनात खोलवर रुजली

या सोहळ्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना रविंद्र चव्हाण भावूक झाले. राखीच्या धाग्यात गुंफलेले बहिणींचे निरागस प्रेम, त्यांचे हसरे चेहरे आणि डोळ्यांतील स्वप्नांनी या सणाला खरी श्रीमंती दिली आहे, असे ते म्हणाले. वयाने लहान असलेल्या या बहिणींची स्वप्ने खूप मोठी आहेत. त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे आणि आयुष्यात मोठी भरारी घेता यावी, यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचा संकल्प त्यांनी याप्रसंगी केला.


Topics mentioned in this article