Mumbai News: मुंबई विमानतळ आणि ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याची धमकी; मुंबई पोलिसांना धमकीचा मेल
Mumbai News : मुंबई विमानतळाला पुन्हा धमकी मिळाली आहे. मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी अज्ञातांकडून मिळाली आहे. मुंबई विमानतळ पोलिसाच्या ईमेल आयडीवर धमकीचा मेल पाठवण्यात आला आहे.
दहशतवादी अफझल गुरू आणि सॅवक्कू शंकर यांना अन्यायकारक रितीने फाशी देण्यात आली असं म्हणत ही धमकी देण्यात आली आहे. मेलमध्ये हॉटेल ताजमहल पॅलेस आणि छत्रपी शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे.