Titwala News: टिटवाळ्याची 'तपोवन'भरारी,फक्त 3 वर्षांत उभारणार 50,000 झाडांचे घनदाट जंगल, वाचा काय आहे प्रकल्प?

Titwala News : कल्याणजवळील टिटवाळा येथे लवकरच 50,000 देशी झाडांचे एक मोठे आणि घनदाट जंगल उभे राहणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Titwala News : टिटवाळ्यात पर्यावरणाच्या दृष्टीने एक अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
कल्याण:

Titwala News : कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (केडीएमसी) आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) यांच्या संयुक्त प्रयत्नातून कल्याणजवळील टिटवाळा येथे लवकरच 50,000 देशी झाडांचे एक मोठे आणि घनदाट जंगल उभे राहणार आहे. पहिल्या टप्प्यात 30,000 देशी वृक्षांची 'मियावाकी' पद्धतीने लागवड करण्याच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला नुकताच मांडा-टिटवाळ्यामध्ये प्रारंभ करण्यात आला आहे. एका बाजूला नाशिकमध्ये वृक्षतोडीचा विषय चर्चेत असताना, टिटवाळ्यात मात्र पर्यावरणाच्या दृष्टीने एक अत्यंत सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.

काय आहे उपक्रम?

हा उपक्रम मांडा-टिटवाळा येथील इंदिरा नगर स्मशानभूमीच्या परिसरात असलेल्या मोकळ्या जागेवर राबवला जात आहे. जपानच्या 'मियावाकी' पद्धतीचा वापर करून येथे वृक्षलागवड केली जात आहे. कमीत कमी जागेमध्ये अतिशय वेगाने आणि घनदाट जंगल फुलवण्यासाठी ही पद्धत जगभरात प्रसिद्ध आहे. केडीएमसी क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून ही पद्धत यशस्वी ठरत आहे. 

या नवीन जंगलात वड, पिंपळ, कदंब, उंबर यांसारख्या देशी वृक्षांसह मसाला आणि आयुर्वेदिक झाडांचाही समावेश आहे. या संपूर्ण वृक्षारोपण प्रकल्पाचा खर्च भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) उचलत आहे, ज्यामुळे केडीएमसीला याकरिता एकही रुपया खर्च करावा लागणार नाही.

( नक्की वाचा : Kalyan News : शाळेत खेळायचं वय...पण हातात शिट्टी! कल्याणमधील वाहतूक कोंडीने चिमुकल्यावर कामाची वेळ आणली, Video )

या वृक्षलागवडीच्या उपक्रमाचा प्रारंभ केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, बीपीसीएलचे पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे, उपआयुक्त संजय जाधव आणि सावली संस्थेचे माने यांच्या उपस्थितीत करण्यात आला. 

Advertisement

पहिल्या टप्प्यात 30,000 देशी वृक्षांच्या लागवडीवेळी आयुक्तांसह बीपीसीएलचे महाव्यवस्थापक आणि परिसरातील शाळांमधील शेकडो विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

( नक्की वाचा : Dombivli News : 'तुम्ही घर सोडा, नाहीतर सोडणार नाही'; डोंबिवलीत 90 वर्षांच्या आजीबाईंना भूमाफियांची धमकी )

यावेळी उपस्थितांशी संवाद साधताना केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना शक्य होईल तिथे एक झाड लावून ते जगवण्याचे आवाहन केले. तसेच,, येत्या वर्षभरात कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकूण 1,00,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शहरातील विविध मोकळ्या जागांवर ही झाडे लावण्यात येणार आहेत, अशी माहिती आयुक्तांनी यावेळी दिली

Topics mentioned in this article