Pune News: पुण्यातील 'ही' पर्यटन स्थळं पुढील 3 महिने राहणार बंद

पण आता जर कोणी असा प्लॅन करणार असाल, तर थोडं थांबा. त्यांना पुढचे 3 महिने पुण्यातील काही पर्यटन स्थळांना भेटी देता येणार नाहीत.

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

रेवती हिंगवे 

पावसाळा आला की अनेक जण वर्षा पर्यटनाला प्राधान्य देतात. अनेक जण आपापल्या जवळच्या निसर्गरम्य पर्यटन स्थळी धाव घेतात. पाऊसामुळे अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत जी सौंदर्याचा खजाना ठरतात. त्यामुळे आपोआप पर्यटक त्या ठिकाणी ओढले जातात. त्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते. कोणी परिवारासोबत तर कोणी मित्रांसोबत या ठिकाणी हमखास जातात. पुण्यात अशी अनेक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहेत. त्यात गड-किल्ले,धरण,नदी,बॅक वॉटर्स यांचा समावेश आहे. इथं पुणेकर सुट्टीच्या दिवशी हमखास जातात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पण आता जर कोणी असा प्लॅन करणार असाल, तर थोडं थांबा. त्यांना पुढचे 3 महिने पुण्यातील काही पर्यटन स्थळांना भेटी देता येणार नाहीत. कारण ही तसचं आहे. पावसामुळे पुण्यातील ही निसर्गरम्य पर्यटन स्थळे पर्यटकांना भूरळ घालत असतात. पण तेवढीच ती धोकादायक ही होत असतात. त्यामुळेच अशा धोकादायक पर्यटन स्थळांवर जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मोठी दुर्घटना होवू नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे.  

ट्रेंडिंग बातमी - श्रावण महिन्यात तुमच्या राशी नुसार करा 12 ज्योतिर्लिंग दर्शन, नक्कीच बदलेल तुमचं नशिब

पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या आदेशानुसार 7 जून 2025 ते 31 ऑगस्ट 2025 पर्यंत पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळ बंद असणार आहेत. त्यात राजगड किल्ला, सिंहगड किल्ला, एकवीरा देवी, कारला लेणी, भाजे लेणी, भाजे धबधबा, राजगड किल्ला, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तिकोणा किल्ला, टायगर पॉईंट, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉइंट, पवना धरण हे सगळे पर्यटन स्थळ बंद असतील. काही प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. जर त्याचे कोणी उल्लंघन केले तर कायदेशीर करवाई होणार आहेत. 

प्रतिबंधात्मक आदेश काय? 

1) पावसामुळे वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे व पोहणे.

2) धबधब्यावर जाणे अथवा पाण्याच्या प्रवाहाखाली बसणे.

3) पावसामुळे धोकादायक झालेली ठिकाणे,धबधबे,दऱ्यांचे कठडे, धोकादायक वळणे इत्यादी ठिकाणी सेल्फने काढण्यास व कोणत्याही स्वरुपाचे चित्रीकरणे करण्यास बंदी.

4) पाससामुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक धबधब्याच्या परिसरामध्ये मद्यपान करण्यास व मद्यधुंद अवस्थेत प्रवेश करणे, मद्य बाळगणे, मद्य वाहतुक करणे,अनाधिकृत मद्य विक्री करणे व उघड्यावर मद्य सेवन करणे.

Advertisement

5) वाहतुकीचे रस्ते तसेच धोकादायक ठिकाणी वाहने थांबविणे

6) वाहन अतिवेगाने अथवा वाहतुकीस अडथळा होईल अशा वेगाने चालविणे.

7) वाहनांची ने आण करताना बेदकारपणे वाहन चालवून इतर वाहनांना धोकादायक स्थितीत ओव्हरटेक करणे.

8) सार्वजनिक ठिकाणी खाद्य पदार्थ, कचरा, काचेच्या व प्लास्टीकच्या बाटल्या, थर्माकॉलचे व प्लास्टीकचे साहित्य उघड्यावर इतरत्र फेकणे.

9) सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या महिलांची छेडछाड करणे, टिंगल टवाळी करणे, महिलांशी असभ्य वर्तन करणे, असभ्य अश्लिल हावभाव करणे अथवा लज्जा निर्माण होईल असे कोणतेही वर्तन करणे.

10) सार्वजनिक ठिकाणी मोठ्या आवाजात संगित यंत्रणा वाजविणे, डिजे सिस्टीम वाजविणे, गाडीतील स्पिकर/उफर मोठ्या आवाजात वाजविणे यामुळे ध्वनी प्रदुषण करणे.

11) ज्या कृतीमुळे ध्वनी, वायु व जल प्रदुषण होईल अशी कोणतीही कृती करणे.

12) धबधबे, धरणे व नदी आदी परिसरात सर्व दुचाकी, चारचाकी व सहाचाकी वाहनांना प्रवेश करण्यास मनाई.