जाहिरात

श्रावण महिन्यात तुमच्या राशी नुसार करा 12 ज्योतिर्लिंग दर्शन, नक्कीच बदलेल तुमचं नशिब

असे मानले जाते की या महिन्यात कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने नशीब बदलू शकते. मात्र, राशीनुसार ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने अधिक लाभ मिळतो.

श्रावण महिन्यात तुमच्या राशी नुसार करा 12 ज्योतिर्लिंग दर्शन, नक्कीच बदलेल तुमचं नशिब

Jyotirling visit according to Rashi: हिंदू धर्मात भगवान शंकराच्या पूजेला खूप महत्त्व आहे. देशभरात भगवान शंकराची अनेक मंदिरे असली तरी, 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन अत्यंत महत्वाचे मानले जाते. श्रावण महिना जवळ येत आहे. हिंदू पंचांगानुसार हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. श्रावण महिना भगवान शंकराला समर्पित आहे. या महिन्यात शिवभक्त शिवलिंगावर जलाभिषेक करतात. श्रावणी सोमवारी पाळतात. त्या दिवशी उपवास ठेवला जातो. या महिन्यात 12  ज्योतिर्लिंगांच्या दर्शनालाही खूप महत्त्व आहे. असे मानले जाते की या महिन्यात कोणत्याही एका ज्योतिर्लिंगाचे दर्शन केल्याने नशीब बदलू शकते. मात्र, राशीनुसार ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्याने अधिक लाभ मिळतो. इन्स्टाग्रामवर aradhanapal या अकाउंटवरील पोस्टमध्ये राशीनुसार ज्योतिर्लिंगांच्या दर्शनाबद्दल सांगितले आहे. कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे हे आपण पाहूयात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

कोणत्या राशीच्या व्यक्तींनी कोणत्या ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे?

मेष राशी (Mesh Rashi): 
मेष राशीच्या व्यक्तींनी रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. चार धामांपैकी एक असलेल्या या तीर्थक्षेत्राबद्दल असे मानले जाते की भगवान श्रीरामाने लंकेवर विजय मिळवण्यापूर्वी येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. याला सेतुबंध तीर्थ असेही म्हणतात.

वृषभ राशी (Vrushabh Rashi): 
वृषभ राशीच्या व्यक्तींनी सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. गुजरातमधील सौराष्ट्रात असलेले सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते. अशी श्रद्धा आहे की चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या शापातून मुक्ती मिळवण्यासाठी येथे शिवाची तपस्या केली होती. सोमनाथमध्ये पूजा केल्याने क्षयरोग आणि इतर शारीरिक कष्ट दूर होतात. येथील सोमकुंड पापनाशक मानले जाते.

मिथुन राशी (Mithun Rashi): 
मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी नागेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन सर्वात जास्त पुण्यदायी आहे. गुजरातमधील द्वारकेजवळ असलेल्या नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाने सर्व प्रकारचे भय आणि अडथळे दूर होतात.

कर्क राशी (Kark Rashi): 
कर्क राशीच्या व्यक्तींना ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन अत्यंत लाभदायक मानले जाते. मध्य प्रदेशातील इंदूरजवळ नर्मदा नदीच्या काठी असलेले हे मंदिर 'ॐ' च्या आकाराचे आहे. येथे दर्शन केल्याने शिवलोकाची प्राप्ती होते.

सिंह राशी (Singh Rashi): 
सिंह राशीच्या व्यक्तींनी बाबा बैद्यनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. झारखंडमधील देवघर येथे असलेले हे नववे ज्योतिर्लिंग चिंताभूमी म्हणूनही ओळखले जाते. अशी मान्यता आहे की श्रावण महिन्यात येथे जलाभिषेक केल्याने सर्व प्रकारचे आजार आणि दुःखातून मुक्ती मिळते.

कन्या राशी (Kanya Rashi): 
कन्या राशीच्या व्यक्तींनी मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घ्यावे. आंध्रप्रदेशातील श्रीशैल पर्वतावर असलेल्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाबद्दल असे मानले जाते की, केवळ त्याच्या दर्शनाने अश्वमेध यज्ञाएवढे फळ मिळते. विवाह संबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते.

तुला राशी (Tula Rashi): 
तुला राशीच्या व्यक्तींनी उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन अवश्य करावे. महाकालेश्वर हे एकमेव दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग आहे. अशी मान्यता आहे की महाकालेश्वराच्या दर्शनाने जीवनातील सर्व भय आणि काळाचे भय दूर होते.

वृश्चिक राशी (Vrushchik Rashi): 
वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन अवश्य करावे. 12 ज्योतिर्लिंगांमध्ये श्री घृष्णेश्वर हे अंतिम स्थानावर आहे. संभाजीनगरजवळ असलेले हे मंदिर घृष्णेश्वर देवीच्या नावाशीही संबंधित आहे. अशी मान्यता आहे की श्री घृष्णेश्वराच्या दर्शनाने संतान सुख, विवाह योग आणि कौटुंबिक समस्यांपासून मुक्ती मिळते.

धनु राशी (Dhanu Rashi): 
धनु राशीच्या व्यक्तींसाठी काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन उत्तम आहे. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ मंदिरामुळे हे शहर शिवनगरी मानले जाते. अशी श्रद्धा आहे की प्रलयात जेव्हा सर्व काही नष्ट होईल, तेव्हाही काशी आणि तेथील शिवलिंग अविचल राहील.

मकर राशी (Makar Rashi):
मकर राशीच्या व्यक्तींनी महाराष्ट्रातील भीमाशंकरचे दर्शन घ्यावे. अशी मान्यता आहे की भगवान शिवाने त्रिपुरासुराचा वध केल्यानंतर येथे विश्राम केला होता. हे ज्योतिर्लिंग भीमा नदीच्या काठी आहे. भीमा नदीला शिवशक्तीचे प्रतीक मानले जाते.

कुंभ राशी (Kumbh Rashi): 
कुंभ राशीच्या व्यक्तींनी केदारनाथचे दर्शन घेणे महत्त्वाचे आहे. उत्तराखंडमध्ये हिमालयाच्या कुशीत असलेले केदारनाथ हे भगवान शिवाचे आवडते धाम मानले जाते.

मीन राशी (Meen Rashi): 
मीन राशीच्या व्यक्तींसाठी त्रयंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्रातील नाशिकमध्ये असलेल्या त्रयंबकेश्वर ज्योतिर्लिंगात तीन मुखी शिवलिंगाची पूजा केली जाते, जे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com