'लोणावळा खंडाळा बंद करा, तुम्ही आमच्या पोटावर पाय आणला'

पावसाळी पर्यटनावर 31 जुलैपर्यंत निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ज्यांची याच्यावरती रोजी रोटी अवलंबून आहे त्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
पुणे:

पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने पुणे आणि परिसरातल्या पावसाळी पर्यटनावर 31 जुलैपर्यंत निर्बंध लादले आहेत. त्यामुळे ज्यांची याच्यावरती रोजी रोटी अवलंबून आहे त्यांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. भुशी डॅम परिसरातल्या जळपास दीड हजार कुटुंबाचा या चार महिन्यातला व्यवसाय बुडणार आहे. त्यामुळे बुशी डॅम, लोणावळा खंडाळ्यातील गाववाले भलतेच आक्रमक झाले आहेत. आमच्या पाठीत तुम्ही वार केला. चार महिनेच आमचा धंदा असतो. त्यावरही तुम्ही निर्बंध लादले. आम्हाला विश्वासात घेतले नाही असा आरोप आता गावकरी करत आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लोणावळा खंडाळा बंद करा 

लोणावळा खंडाळ्यात अनेक ठिकाणी पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. या हंगामात छोट्या दुकानदारांची चलती असते. या चार महिन्यातच त्यांचा सिजन असतो. या चार महिन्यासाठी कर्ज काढून दुकानेही चालवली जातात असे स्थानिक गावकरी सांगतात. पण या वर्षी या दुकानदारांवर निर्बंधांची कुऱ्हाड कोसळली आहे. लोणावळा खंडाळ्यातील पावसाळी पर्यटन स्थळांवर पर्यटकांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. शिवाय तिथे असणाऱ्या दुकानांवरही  निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे स्थानिक गावकरी चांगलेच भडकलेत. जवळपास दिड हजार कुटुंबांची उपजिविका या दुकानांवर चालते. हे निर्बंध लादताना कोणतीही पुर्वसुचना दिली नसल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आमची दुकानं बंद करणार असाल तर मग लोणावळा खंडाळाच बंद करा. सर्व हॉटेल्स मोठी दुकानंही बंद करा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. एका रात्रीत हा निर्णय घेवून आमच्या पाठीत खंजिर खुपसल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - 'ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री दाखवा अन् 1 गावठी कोंबडा, वलगणीचे मासे बक्षीस मिळवा'

वर्षा पर्यटन स्थळावर निर्बंध का?

पावसाळ्यात बुशी डॅमवर मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात. शिवाय लोणावळा खंडाळ्यातील अन्य  वर्षा पर्यटन स्थळावरही मोठी गर्दी असते. मात्र काही दिवसा पूर्वी इथं एक मोठी दुर्घटना घडली. एकाच कुटुंबातील पाच जण वाहून गेले. पर्यटकन नियम पाळत नाहीत. मजा करण्याच्या नादात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. या घटना टाळण्यासाठी पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा फटका मात्र स्थानिक गावकऱ्यांना बसला आहे. हे निर्बंध लादल्यानंतरही पर्यटक इथं येणार नाहीत का? असा सवाल त्यांनी केला आहे. शिवाय या निर्बंधानंतरही कोणाचा जीव गेला तर त्याला जबाबदार कोण असा प्रश्नही त्यांनी प्रशासनाला केला आहे.  

Advertisement