'ज्याच्या घरातली लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की! धर्मवीर 2 चा ट्रेलर आला

ज्याच्या घरातली लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की!'हा डायलॉग या या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात नक्की काय असेल, तो कोणत्या वळणावरचा असेल, त्यातून काय संदेश दिला गेलाय याचा अंदाज या ट्रेलरमधून येतो.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

बहुचर्चीत धर्मवीर 2 चा ट्रेलर प्रदर्शीत करण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ट्रेलरमध्ये कट्टर हिंदुत्वा बरोबरच मुस्लिमांचाही सन्मान अनंत दिघे कशा पद्धतीने करत होते हे दाखवण्यात आले आहे. ' ज्याच्या घरातली लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की!'हा डायलॉग या या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आला आहे. त्यामुळे या चित्रपटाच्या दुसऱ्या भागात नक्की काय असेल, तो कोणत्या वळणावरचा असेल, त्यातून काय संदेश दिला गेलाय याचा अंदाज या ट्रेलरमधून येतो. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

धर्मवीर 2 ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होणार आहे. त्याच्यात पुढच्या महिन्यात विधानसभा निवडणुका असतील. त्यामुळे बरोबर वेळ साधून हा चित्रपट प्रदर्शित केला गेला आहे. त्या आधी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये एक मुस्लिम महिला अनंत दिघेंना राखी बांधण्यासाठी येते. त्यावेळी तिने बुरखा घातलेला असतो. अनंत दिघे तिला बुरखा काढायला सांगतात. बुरखा काढणार नसतील तर राखी बांधू नकोस असेही ते तिला खडसावतात. त्यानंतर ती बुरखा काढते. तिला मारहाण झाल्याचे त्यांना समजते. त्यानंतर ते म्हणतात घरातली लक्ष्मी दु:खी, त्याची बरबादी नक्की! त्यानंतर ते राखी बांधायला आलेल्या महिलांन घेवून त्या मुस्लिम महिलेच्या घराच्या दिशेने कुच करतात. 

ट्रेंडिंग बातमी - पापाचा घडा कोणाचा भरला? शिंदेंचे ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर

धर्मवीर चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग येईल असे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले होते. या चित्रपटातून अनंत दिघे यांच्या कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. दुसऱ्या भागात एकनाथ शिंदे यांच्यावर या चित्रपटाचा फोकस असेल असे सांगितले जाते. मात्र ते सस्पेन्स ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या दुसऱ्या भागाबाबत उत्सुकता आहे. यात नक्की काय दाखवले जाणार आहे याची उत्सुकता आहे. शिवाय ठाकरे बाबतही या चित्रपटात काही असणार आहे का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने त्याचा कितपत परिणाम होईल याबाबतही आता चर्चा सुरू झाल्या आहेत.  

Advertisement
Topics mentioned in this article