पूजा खेडकर प्रकरणाला सनसनाटी वळण, तक्रार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर दाखल होणार गुन्हा?

Puja Khedkar : वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकरी पूजा खेडकर प्रकरणातील एक मोठी बातमी समोर आलीय. या प्रकरणात पूजा यांच्याविरोधात तक्रार करणारे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे अडचणीत आले आहेत.

Advertisement
Read Time: 2 mins
P
मुंबई:

वादग्रस्त ट्रेनी IAS अधिकरी पूजा खेडकर प्रकरणातील एक मोठी बातमी समोर आलीय. या प्रकरणात पूजा यांच्याविरोधात तक्रार करणारे पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे अडचणीत आले आहेत. पूजा खेडकर यांनी दिवसे यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केलीय.

 ( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मला त्रास दिला असा आरोप पूजा खेडकर यांनी केलाय. पूजा खेडकर यांची काल (सोमवार, 15 जुलै) रोजी चौकशी करण्यात आली. तीन डीवायएसपी अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली. त्यानंतर पूजा खेडकर यांनी जबाब नोंदवला आहे. या प्रकरणात पोलीस पूर्ण चौकशी करणार आहेत. त्यानंतर डॉ. दिवसे यांच्याविरोधात FIR दाखल करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे.

पूजा खेडकर यापूर्वी पुणे जिल्ह्यात ट्रेनी म्हणून कार्यरत होत्या. त्यानंतर त्यांची मागच्या आठवड्यात वाशिममध्ये बदली करण्यात आली होती. त्यांच्यासंबंधी वेगवेगळी प्रकरणं उघडकीस आल्यानंतर खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी स्थगित करण्यात आला आहे. या प्रकराच्या कारवाईची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. पुढील कारवाईसाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये लालबहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी, मसुरी इथं त्यांना 23 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

( नक्की वाचा : IAS पूजा खेडकरांना दणका, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच झाली मोठी कारवाई )
 

कोण आहेत डॉ. दिवसे?

डॉ. सुहास दिवसे यांची फेब्रुवारी 2024 मध्ये पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 2009 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत.  दिवसे यांनी जिल्हाधिकारी होण्यापूर्वी  पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. क्रीडा आयुक्त, पीएमआरडीए आयुक्त तसंच उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांनी यापूर्वी काम केलं आहे. 

Advertisement

दिवसे यांनी केली होती तक्रार

पूजा खेडकर यांच्याविरोधात सुहास दिवसे यांनी सर्वप्रथम तक्रार दाखल केली होती. प्रशिक्षणार्थी असलेल्या पूजा खेडकर यांनी स्वतंत्र गाडी, बंगला, कर्मचारी, सुरक्षा, शिपाई, स्वतंत्र केबिनची मागणी केली होती. मात्र प्रशिक्षणार्थी पातळीवर या सुविधा दिल्या जात नसतानाही त्यांनी आपल्या खासगी ऑडीकारला लाल रंगाचा दिवा लागला होता. या सर्व प्रकारानंतर पुण्याचे जिल्हाधिकारी सुहार दिवसे यांनी अप्पर मुख्य सचिवांना पत्र लिहून यासंदर्भात तक्रार केली होती.