जाहिरात

Thane Ghodbunder Road : घोडबंदर रोडवरुन प्रवास करताय? 3 दिवस वाहतुकीत मोठे बदल

तीन दिवसांसाठी घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. 

Thane Ghodbunder Road : घोडबंदर रोडवरुन प्रवास करताय? 3 दिवस वाहतुकीत मोठे बदल

Thane Ghodbunder Road : ठाण्यातील घोडबंदर रोडवर दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. या रस्त्यावरील काम लवकर पूर्ण करण्यात येईल, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल असं आश्वासन यापूर्वीही अनेक नेत्यांनी दिलं आहे. मात्र प्रत्यक्षात या रस्त्यावरील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस मनस्ताप वाढवणारी ठरत आहे. 

दरम्यान तीन दिवसांसाठी घोडबंदर रोडवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. घोडबंदर रोडवर पुढील ३ दिवस जड-अवजड वाहनासाठी वाहतूक बंद करण्यात आली आहे. रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी घोडबंदर रोडवरील गायमुख जंक्शन ते मुख्य नीरा केंद्रापर्यंत ठाण्याच्या दिशेने या मार्गावर रस्त्याच्या दुरुस्तीचं काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे १२,१३,१४ डिसेंबर या दिवसात अवजड वाहनासाठी वाहतूक बंद असणार आहे.

Navi Mumbai : 6 हजार किमी प्रवास, मित्राचं लग्न अन् नवी मुंबईतील ती रक्तबंबाळ रात्र; तरुणाच्या मृत्यूने कुटुंब हादरलं!

नक्की वाचा - Navi Mumbai : 6 हजार किमी प्रवास, मित्राचं लग्न अन् नवी मुंबईतील ती रक्तबंबाळ रात्र; तरुणाच्या मृत्यूने कुटुंब हादरलं!

पर्यायी मार्गाचा वापर..

याकरिता पर्यायी मार्गाचा वापर वाहतूक विभागाकडून करण्याचे आव्हान करण्यात आले आहे. माजिवडा (Y जंक्शन) मार्गे खारेगाव मार्गे पुढे जाता येईल किंवा कापूरबावडी जंक्शन मार्गे भिवंडीच्या दिशेने पुढे जाता येईल. या मार्गाचा वापर करून वाहन चालकाना आपल्या इच्छित स्थळी जाता येईल. घोडबंदर रोडवर वाहतूक कोंडी दिवसागणिक वाढतच आहे. या घोडबंदर रोड वर राहणाऱ्या नागरिकांनी यासाठी जन आंदोलन देखील उभारले होते.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com