Ulhasnagar News : उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात महिला रूग्णांवर जमिनीवर उपचार, रुग्णसंख्या वाढल्यानं गैरसोय

उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भागासोबतच कर्जत, कसारा, मुरबाड अशा ग्रामीण भागातूनही रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येत असतात.

जाहिरात
Read Time: 2 mins

निनाद करमरकर, कल्याण

हिंगोली जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया झाल्यानंतर 43 महिलांना भर थंडीत जमिनीवरती झोपवण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तसाचा काहीसा प्रकार उल्हासनगरमध्ये घडला आहे. उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात बेड कमी पडू लागल्यानं महिला रूग्णांवर अक्षरशः फरशीवर झोपून उपचार घेण्याची वेळ आली आहे. हॉस्पिटल 200 बेडचं असून रुग्णांचा वाढता भार पाहता ते कमी पडू लागलं आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

उल्हासनगरच्या शासकीय जिल्हा मध्यवर्ती रुग्णालयात उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरी भागासोबतच कर्जत, कसारा, मुरबाड अशा ग्रामीण भागातूनही रुग्ण उपचारासाठी मोठ्या संख्येने येत असतात. रुग्णांच्या या वाढत्या संख्येला आता हे रुग्णालय अपुरं पडू लागलं आहे. 

(नक्की वाचा-  Cabinet Portfolio: CM फडणवीसांची ताकद, साताऱ्याचा दबदबा अन् दिग्गजांची कोंडी, खाते वाटपातील 10 वैशिष्ट्ये)

रुग्णालयात महिला कक्ष 5 आणि 6 मध्ये 60 बेड्स असून सध्या या वॉर्डमध्ये 120 महिला उपचार घेत आहेत. त्यामुळे वाढीव 60 महिलांना जमिनीवर झोपून उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे वाढती लोकसंख्या आणि काळाची गरज पाहता आता हे रुग्णालय वाढवण्याची नितांत गरज व्यक्त होत असून शासनानं याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

(नक्की वाचा : State Cabinet Portfolio राज्यमंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर, कोणतं खातं कुणाकडं? वाचा सर्व माहिती )

हिंगोलीतही महिला रुग्णांना जमिनीवर जोपण्याची वेळ

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या आखाडा बाळापूर येथील ग्रामीण रुग्णालयात कुटुंबनियोजन शस्त्रक्रियेसाठी आलेल्या महिलांना बेडची सुविधा नसल्याने चक्क जमिनीवर गाद्या टाकून झोपवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. 43 महिलांना रुग्णालय प्रशासनाने जमिनीवर झोपवलं होतं.

Advertisement

Topics mentioned in this article