Pune News: पुण्यात जाणाऱ्या पर्यटकांना अलर्ट करणारी बातमी! सिंहगड किल्ल्यावर घडली हादरंवून टाकणारी घटना

पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एका पर्यटकासोबत भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं स्थानिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Man Dies At Pune Sinhagad Fort
पुणे:

अजिंक्य धायगुडे पाटील, प्रतिनिधी

Pune Sinhagad Fort latest News : पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर एका पर्यटकासोबत भयंकर घटना घडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळं स्थानिकांसह पर्यटकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सिंहगड किल्ल्यावर ट्रेकिंग साठी गेलेल्या एका 55 वर्षीय पर्यटकाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. सुरेश रघुनाथ भोकरे असं मृत व्यक्तीचं नाव असून तो गोकुळनगर,कात्रज येथील रहिवासी होता.

सिंहगडावर नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार,भोकरे हे त्यांच्या मित्रांसह सिंहगडवर आले होते. पहाटे 5 वाजता हे सर्व मित्र गडाच्या पायथ्याशी असलेल्या आतकरवाडीत पोहोचले. सव्वा पाचच्या सुमारास त्यांनी पायवाटेने गड चढण्यास सुरुवात केली.गड चढत असताना पढेर मेटावरील मारुती मंदिराजवळ पोहोचल्यानंतर भोकरे यांना अचानक चक्कर आली आणि ते खाली कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने स्ट्रेचरवरून गडाच्या पायथ्याशी आणून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News : कल्याण-मुरबाड आणि कल्याण-भिवंडी मार्गावर RTO ची विशेष मोहीम, 'त्या' 12 टॅक्सींवर केली कारवाई

नागरिकांसह पर्यटकांनी सतर्क राहा 

या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी बळीराम वायकर,नितीन गोळे,उत्तम खामकर आणि संदीप कोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मदतकार्य केलं. सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. तीव्र उन्हामुळे आणि शारीरिक श्रमामुळे वृद्ध तसेच आजारी व्यक्तींनी डोंगर चढणे टाळावे,असे आवाहन सिंहगड वन विभागाचे वन परिमंडळ अधिकारी समाधान पाटील यांनी केले आहे.