नाशिक जवळील प्रसिद्ध श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर परिसरात एक अत्यंत विलोभनिय दृश्य पाहायला मिळालं आहे. मंदिराच्या आवारातील अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या 65 फूट खोल 'अमृतकुंडा'च्या दुरुस्ती व संवर्धनाचे काम सध्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) कडून सुरू आहे. या अंतर्गत कुंडातील पाणी उपसून जेव्हा तळाची पूर्ण स्वच्छता करण्यात आली, तेव्हा तिथे एक प्राचीन शिवलिंग स्पष्टपणे दिसू लागले.
अनेक दशकांनंतर अमृतकुंडाच्या तळाशी असलेल्या या महादेवाच्या लिंगाचे रूप पाहायला मिळाल्याने मंदिर परिसरात एकच चैतन्य पसरले आहे. हा दुर्मिळ नजारा पाहण्यासाठी मंदिर प्रशासकीय अधिकारी आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तिथे गर्दी केली होती.
पाहा VIDEO
(नक्की वाचा- शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचे पैसे या तारखेला खात्यात जमा होणार, कृषिमंत्र्यांची विधानसभेत घोषणा अभिषेकासाठी वापरल्या जाणाऱ्या पेशवेकालीन कुंडाचे महत्त्व 65 फूट खोल हे अमृतकुंड पेशवेकालीन मानले जाते. या कुंडाची रचना आणि वास्तुकला अत्यंत अद्वितीय आहे. या कुंडाला त्र्यंबकेश्वर मंदिरात सर्वोच्च धार्मिक स्थान आहे. कारण, मुख्य श्री त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची दैनंदिन पूजा, अर्चा आणि महाअभिषेकासाठी याच अमृतकुंडातील पवित्र पाण्याचा उपयोग केला जातो. सुरक्षेच्या आणि पावित्र्याच्या कारणास्तव भाविकांना या अमृतकुंडात प्रवेश देण्यास पूर्णपणे बंदी आहे. हा परिसर अतिशय सुरक्षित ठेवला जातो. (नक्की वाचा- Pune Lohagad Case: सियाने लग्नाच्या शॉपिंगसाठी केतनकडून उकळली मोठी रक्कम; एवढ्या पैशांचं काय केलं?) 'त्र्यंबक' या शब्दाचा अर्थ ज्यांना तीन डोळे आहेत किंवा जे तीन देवतांचे (ब्रह्मा, विष्णू आणि महेश) एकत्रित रूप आहेत, असा होतो. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी त्र्यंबकेश्वर हे एकमेव असे स्थान आहे, जिथे या तिन्ही देवांची छोटी लिंगे एकाच मुख्य पात्रात स्थित आहेत. हे भव्य मंदिर नाशिक शहरापासून सुमारे 28 किलोमीटर अंतरावर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी वसलेले आहे. याच ब्रह्मगिरी पर्वतावरून दक्षिण भारताची गंगा मानल्या जाणाऱ्या पवित्र 'गोदावरी' नदीचा उगम होतो.त्र्यंबकेश्वर मंदिराचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा