'तू बाहेर ये, कलमा म्हण', लेकीसमोर घातल्या वडिलांच्या छातीत गोळ्या, पुण्यातल्या मुलीनं सांगितला सर्व प्रसंग

Pahalgam Terror Attack: पुण्यातल्या संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी कसं ठार केलं, याची संपूर्ण कहाणी त्यांची मुलगी आसावरीनं NDTV ला सांगितली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 26 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातल्या 6 जणांचा समावेश आहे. दहशतवाद्यांनी पर्यटकांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेल्या ठिकाणालाच लक्ष्य केलं. या दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला. त्यानंतर गोळ्या घातल्या, अशी माहिती आता पुढे येत आहे. पुण्यातील जगदाळे कुटुंबीयांना देखील तोच अनुभव आला. संतोष जगदाळे यांना दहशतवाद्यांनी कसं ठार केलं, याची संपूर्ण कहाणी त्यांची मुलगी आसावरीनं NDTV ला सांगितली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

आम्ही लपून बसलो होतो पण...

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यावेळी पुण्यातील व्यावसायिक संतोष जगदाळे आणि कुटुंबीय त्याच ठिकाणी होते. गोळीबाराचा आवाज आल्यानंतर ते त्यांच्या कुटुंबीयांसह एका तंबूमध्ये लपून बसले होते.

त्यांना तंबूच्या बाहेर पोलिसांच्या गणवेशाशी साधर्म्य असलेले लोकं दिसली आणि तिथंच त्यांचा घात झाला, असं आसावरीनं सांगितलं. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु आहे, असं आम्हाला वाटलं. त्यानंतर मी, माझी आई प्रगती जगदाळे आणि वडील संतोष जगदाळे तसंच काही पर्यटक जवळच्या तंबूत लपून बसलो. आमच्या तंबूच्या जवळच गोळीबार ऐकू येत होता. 

( नक्की वाचा :  India vs Pakistan : भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरला, शिमला करार केला स्थगित )

त्यानंतर दहशतवाद्यांनी माझ्या वडिलांना चौधरी तू बाहेर ये (चौधरी तू बाहर आ...) असं सांगितलं. त्यांनी आसावरीच्या वडिलांना तंबूच्या बाहेर ओढलं. त्यावेळी त्यांनी तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा देत आहात, असं वडिलांना सुनावलं.'

Advertisement

दहशतवाद्यांनी धर्म विचारला

आसावरीनं पुढं सांगितलं, 'तिथं अनेक जण होते. पण, दहशतवाद्यांनी तेथील पुरुषांना तुम्ही हिंदू आहात की मुस्लीम हे विचारलं आणि त्यानंतर त्यांना टार्गेट केलं. त्यांनी माझ्या वडिलांना काही इस्लामी श्लोक (बहुधा कलमा) म्हणायला सांगितला. वडिलांना ते म्हणता आलं नाही. त्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्या छातीवर तीन गोळ्या मारल्या. एक गोळी डोक्यावर मारली. तर एक पाठीवर मारली, असं 26 आसावरीनं सांगितलं. हे दहशतवादी इतक्यावरच थांबले नाहीत. त्यांनी नंतर काकांवरही गोळ्या झाडल्या, असं ती म्हणाली.