तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सवाचा प्रारंभ, 15 दिवस सुरू राहणाऱ्या कार्यक्रमांची रुपरेषा कशी असेल?

Advertisement
Read Time: 2 mins
तुळजापूर:

महाराष्ट्राची कुलस्वामीनी शक्ती देवता श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास गुरुवार 3 ऑक्टोबर 2024 पासून घटस्थापनेने प्रारंभ होणार आहे. त्यापूर्वी श्रीतुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र उत्सव (Tuljabhavani Mata Sharadiya Navratri Utsav) मंगळवार 24 सप्टेंबर 2024 पासून सुरू होत आहे. प्रतिवर्षीप्रमाणे श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर तर्फे यंदाच्या शारदीय नवरात्र महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमही संपन्न होणार आहेत. 24 सप्टेंबरपासून सुरू होणारे कार्यक्रम 18 ऑक्टोबरपर्यंत चालतील. 

24 सप्टेंबर 2024 - सायंकाळी श्री देविजींची मंचकी निद्रा

3 ऑक्टोबर - पहाटे श्री देविजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, दुपारी १२.०० वाजता घटस्थापना
ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे व रात्रौ छबीना

4 ऑक्टोबर - श्री देविजींची नित्योपचार पुजा व रात्रौ छबीना

5 ऑक्टोबर - श्री देविजींची नित्योपचार पुजा व रात्रौ छबीना

6 ऑक्टोबर - श्री देविजींची नित्योपचार पुजा व रात्रौ छबीना

7 ऑक्टोबर - श्री देविजींची नित्योपचार पुजा, "ललिता पंचमी" रथ अलंकार महापुजा व रात्रौ छबीना

8 ऑक्टोबर - श्री देवीजींची नित्योपचार पुजा, मुरली अलंकार महापुजा व रात्रौ छबीना

9 ऑक्टोबर - श्री देविजींची नित्योपचार पुजा, शेषशाही अलंकार महापुजा व रात्रौ छबीना

नक्की वाचा - पितृपक्षामध्ये दिवा लावताना या गोष्टी ठेवा लक्षात, पितृदोष कमी होण्यास मिळेल मोठी मदत 

10 ऑक्टोबर - श्री देविजींची नित्योपचार पुजा, भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्रौ छबीना

11 ऑक्टोबर - दुर्गाष्टमी, श्री देविजींची नित्योपचार पुजा, महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा व सकाळी 7.00
वाजता होम व हवनास आरंभ, दुपारी 12.15 वाजता पुर्णाहुती व रात्रौ छबीना

12 ऑक्टोबर - श्री देविजींची नित्योपचार पुजा, दुपारी 12.00 वाजता होमावर धार्मिक विधी, घटोत्थापन,
विजया दशमी (दसरा) सार्वत्रिक सिमोल्लंघन, रात्रौ नगरहून येणारे पलंग व संत जानकोजी भगत
बुन्हाणनगर येथून येणारे पालखीची मिरवणूक

13 ऑक्टोबर - उषःकाली श्री देविजींचे शिबिकारोहन, सिमोल्लंघन मंदिराभोवती, मिरवणूक, मंचकी निद्रा, शमी पुजन.

16 ऑक्टोबर - "कोजागिरी पौर्णिमा"

17 ऑक्टोबर - ( मंदीर पोर्णिमा) पहाटे श्री देविजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना, श्री देविजींची नित्योपचार
पुजा व रात्रौ सोलापूरच्या काठ्यांसह छबीना व जोगवा. (मंदीर पोर्णिमा )

18 ऑक्टोबर - श्री देविजींची नित्योपचार पुजा अन्नदान महाप्रसाद व रात्रौ सोलापूरच्या काठ्यांसह छबीना.