Mahabaleshwar News : महाबळेश्वरमध्ये फिरताना अलर्ट राहा, शेतकऱ्यासह एकाला जीव गमवावा लागला, तो पुन्हा आला..

महाबळेश्वरमध्ये गव्यांची थरारक झुंज कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गव्यांमुळे गेल्या आठवड्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Mahabaleshwar Gaur Video Viral

राहुल तपासे, प्रतिनिधी

Mahabaleshwar Latest News Update : महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये नुकताच कडकडीत बंद ठेवण्यात आला होता. मार्केटमधील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. रस्त्यांच्या कामांमुळे प्रदुषण होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे पाचगणी आणि महाबळेश्वरमधील नागरिकांकडून बंद पुकारण्यात आला होता. अशातच आता महाबळेश्वरमध्ये पुन्हा एका संटकाने डोकं वर काढलं आहे. महाबळेश्वर परिसरात दोन गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. या गव्यांची थरारक झुंज कॅमेरात कैद झाली असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या गव्यांमुळे गेल्या आठवड्यात एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता, तर एक जण गंभीर जखमी झाला होता. 

या भागात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच असतो

सातारा जिल्ह्यातील पर्यटन नगरी महाबळेश्वर परिसरात दोन गव्यांची थरारक झुंज पाहायला मिळाली आहे.घनदाट जंगल आणि थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागात वन्य प्राण्यांचा वावर नेहमीच दिसून येतो. मात्र यावेळी दोन बलाढ्य गवे समोरासमोर येत जोरदार झुंज देताना दिसले. हा थरारक प्रसंग नागरिकांनी मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अचानक सुरू झालेल्या या झुंजीमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरणही निर्माण झाले होते.

नक्की वाचा >> Mumbai News : मुंबईतील 'या' उच्चभ्रू सोसायटीतील लोक उतरले रस्त्यावर, अनेकांवर उपासमारीची वेळ, काय घडलंय?

इथे पाहा गव्यांचा थरकाप उडवणारा व्हिडीओ

गवा हा भारतीय जंगलातील अत्यंत शक्तिशाली वन्य प्राणी मानला जातो.प्रौढ गव्याचे वजन साधारण एक टनापर्यंत असू शकते.त्याची उंची जवळपास सहा ते साडेसहा फूटांपर्यंत असते.गव्याचे मजबूत शरीर,तीक्ष्ण शिंगे आणि जबरदस्त ताकद यामुळे तो जंगलातील अत्यंत प्रभावी प्राणी मानला जातो. साधारणपणे गवे कळपाने फिरतात,मात्र प्रजनन काळात नर गव्यांमध्ये अशा प्रकारच्या झुंजी होताना पाहायला मिळतात. जंगलातील अन्न, क्षेत्र किंवा मादीवर हक्क प्रस्थापित करण्यासाठी नर गवे असे एकमेकांशी जोरदार संघर्ष करताना दिसतात. 

Advertisement