जाहिरात

LPG Gas Jugaad : सिलिंडर संपल्यावरही 'या' गावातील बायका राहतात खुश, भन्नाट जुगाड करून 125 घरात पेटवली गॅस

छोट्याशा एकौनी गावात सिलिंडर संपल्यानंतर कोणालाही भीती वाटत नाही. या गावातील जवळपास 150 कुटुंबापैकी 125 घरे अशी आहेत, ज्यांची शेगडी थेट बायोगॅस प्लँटशी जोडलेली आहे.

LPG Gas Jugaad : सिलिंडर संपल्यावरही 'या' गावातील बायका राहतात खुश, भन्नाट जुगाड करून 125 घरात पेटवली गॅस
LPG Gas Jugaad Viral Post

Bio-gas Plant Village: अमेरिका-इराण युद्धामुळे देशातील एलपीजी गॅसच्या पुरवठ्याला मोठा फटका बसला आहे. सिलिंडरच्या किंमतीही गगनाला भिडल्या आहेत. परंतु, उत्तरप्रदेशच्या चंदौली गावात आजही आनंदाचं वातावरण आहे.शहरातील लोक सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लावताता,पण एकौनी गावातील 125 कुटुंब गोबर गॅसचा वापर करून स्वयंपाक बनवतात. या गावातील लोकांनी गोबर गॅसचा प्रयोग यशस्वी करून अनेकांच्या घरातील गॅस पेटवल्या आहेत. 

जागतिक पातळीवर अमेरिका इराण-इस्त्रालयचं युद्ध पेटलं आहे. पण याचे चटके देशातील एलपीजी गॅस व्यवस्थेला बसला आहे.एलपीजीच्या समस्येनं तोंड वर केलं असतानाच उत्तर प्रदेशच्या चंदौली जिल्ह्यातील गाव चर्चेचा विषय बनला आहे. येथील छोट्याशा एकौनी गावात सिलिंडर संपल्यानंतर कोणालाही भीती वाटत नाही. या गावातील जवळपास 150 कुटुंबापैकी 125 घरे अशी आहेत, ज्यांची शेगडी थेट बायोगॅस प्लँटशी जोडलेली आहे. सकाळ-संध्याकाळ तीन-तीन तास पाईपलाईन सप्लायमुळे येथील महिलांचं आयुष्य सुकर बनलं आहे.

बीटेक केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि..

गावातील लाल चंद्र प्रकाश सिंहने ही जबरदस्त आयडिया शोधून काढली.भोपाळवरून बीटेक केल्यानंतर त्यांनी नोकरी सोडली आणि वडिलांची गोशाला सांभाळण्याचा निर्णय घेतला. तिथे आधी फक्त 50 गाई होत्या. आता तिथे 200 गोमाता आहेत. दररोज निघणाऱ्या 3000 किलो गोबरचं काय करावं? या प्रश्नामुळे बायोगॅस प्रकल्प सुरु झाला. वर्ष 2022 मध्ये सुरु झालेलं हे प्रकल्प आज गावातील लाईफलाईन बनलं आहे. 

कंचन सिं आणि अखिलेश सिंग या गावकऱ्यांनी म्हटलंय की,आता त्यांना लाईनमध्ये उभं राहावं लागत नाही. ना महागड्या सिलिंडरचं टेन्शन घ्यावं लागतं. ही बायोगॅस फक्त स्वस्तच नाही, तर एलपीजीच्या तुलनेत याची किंमत अर्धी आहे.आर्थिक बचतीसोबतच हे गावकऱ्यांना आत्मनिर्भर बनवतं.एकौनी गावाचं हे मॉडेल आजच्या युगात कोणत्याही संजीवनी पेक्षा कमी नाही.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com