Vaishnavi Hagawane: 7 दिवस 11 गावं 2 गाड्या, हगवणे बाप-लेकाने पोलिसांच्या नाकावर टिच्चून काय काय केले?

प्रश्न असा आहे. की हगवणे बाप लेक हॉटेल्समध्ये जाऊन पार्ट्या हाणतात मित्रांच्या घरी जातात. आणि आपल्या तपास यंत्रणेला त्याची कुणकुणही लागत नाही?

जाहिरात
Read Time: 3 mins
पुणे:

वैष्णवीच्या संशयास्पद मृत्यूनंतर तब्बल 7 दिवसांनी हगवणे बाप लेकाला पोलिसांनी अटक केली. अट केल्यानंतर राजेंद्र हगवणेला पत्रकारांनी विचारलं, तुला काही पश्चाःताप झालाय का? त्यावर राजेंद्रने हातवारे केले अजिबात नाही. आज पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या बाप लेकांना पोलिसांनी स्वारगेट परिसरातून अटक केली. त्यानंतर बावधन पोलीस ठाण्यामध्ये या दोघांनाही हजर करण्यात आलं. एका पोरीचा हकनाक जीव गेला. एक तान्हं बाळ अनाथ झालं. एक कुटुंब उद्धवस्त झालं. त्यानंतरही गेले सात दिवस या प्रकरणातले आरोपी उजळ माथ्यानं महाराष्ट्रभर फिरत होते. मटणावर ताव मारत होते. हे आता स्पष्ट झालं आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

वैष्णवीचा मृत्यू झाला 16 तारखेच्या मध्यरात्री. लोकेशन होतं पुण्या जवळचं भुकूम गाव. त्यानंतर  17 तारखेला हगवणे बाप-लेक फरार झाले. लोकेशन होतं तळेगाव ताभाडे. दोन्ही गावातलं अंतर फक्त 41 किलोमीटर होतं. तळेगावमध्ये हे दोघे काय करत होते. ते ऐकाल तर तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल. हे दोघे एका हॉटेलमध्ये बसून मटणपार्टी झोडत होते. तांबडा-पांढरा रिचवत होते. म्हणजे निर्लज्जपणाचा कळस म्हणावा लागेल. एकीकडे वैष्णवीची अंत्ययात्रा निघत होती. तिच्यावर अंत्यसंस्कार होत होते. त्याचवेळी हगवणेंचा यथेच्च पाहुणचार सुरु होता. इतकंच नाही तर बाप-लेकाच्या जोडगोळीनं गेल्या 7 दिवसात 11 गावांमध्ये सैर केली. थारपासून बलेनोपर्यंत गाड्या वापरल्या. यथेच्च पार्ट्या झोडल्या. जणू या प्रकरणाचं त्यांना सोयरसुतकच नव्हतं.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी  : बायकोसोबत जबरदस्तीने संबंध, बेडरुमध्ये आक्षेपार्ह व्हिडीओ बनवले... निलेश चव्हाणचे कारनामे

या बाप लेकांचा प्रवास बघा 17 मे रोजी ही जोडगोळी आधी औंध हॉस्पिटलला गेली. तिथून थार गाडीने मुहूर्त लॉन्समध्ये पोहोचले. तिथून त्यांनी वडगाव मावळ गाठलं. पवना डॅममधल्या फार्म हाऊसवर पोहोचले. तेथून पुन्हा आळंदीतल्या एका लॉजवर थांबले. 18 मे रोजी आळंदीतून वडगाव मावळला गेले. तिथून गाडी बदलून बलेनो गाडीने पवना डॅमला बंडू फाटक यांच्याकडे पोहोचले.  19 मे रोजी पवन्यातून निघून साताऱ्याच्या पुसेगावातल्या अमोल जाधव यांच्या शेतावर पोहोचले. 20 मे रोजी पसरणीमार्गे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या कोगनोळीत पोहचले. तिथल्या हेरिटेज हॉटेलला मुक्काम केला. 21 मे रोजी कोगनोळीतल्याच प्रीतम पाटील या मित्राच्या शेतावर पोहोचले. 22 मे रोजी बाप लेकाची जोडगोळी कोगनोळीतून निघाली आणि पुणे शहरात दाखल झाली. पुढचे दोन दिवस ते पुण्यातच होते.

Advertisement

ट्रेंडिंग बातमी - Pune Crime: वैष्णवीला निर्दयीपणे मारहाण, नंतर मटणावर ताव... हगवणे पिता-पुत्राचा धक्कादायक VIDEO

प्रश्न असा आहे. की हगवणे बाप लेक औंधच्या सरकारी रुग्णालयात जातात वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये जाऊन पार्ट्या हाणतात मित्रांच्या घरी जातात. फार्महाऊसवर निवांत होतात. आणि आपल्या तपास यंत्रणेला त्याची कुणकुणही लागत नाही? कमाल आहे पोलिसांची असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आता हगवणेला पकडलं आहे. आता तरी पोलिस वैष्णवीला न्याय मिळवून देतील का? हा खरा प्रश्न आहे. 
 

Advertisement