जाहिरात

Pune Crime: वैष्णवीला निर्दयीपणे मारहाण, नंतर मटणावर ताव... हगवणे पिता-पुत्राचा धक्कादायक VIDEO

Vaishnavi Hagwane Death Case: एका हॉटेलवर राजेंद्र हगवणे आपल्या मित्रासोबत मटणावर ताव मारत होता. यावेळी त्यांनी तांबडा- पांढरा रस्साही मागवल्याचे सांगण्यात येत आहे. 

Pune Crime: वैष्णवीला निर्दयीपणे मारहाण, नंतर मटणावर ताव... हगवणे पिता-पुत्राचा धक्कादायक VIDEO

पुणे: पुण्याच्या मुळशीमधील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाने राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणात गेल्या आठ दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या पिता पुत्रांना अटक करण्यात आली आहे. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर हगवणे पितापुत्र फरार झाले होते. त्यांचा पोलिसांकडून परराज्यात शोध सुरु होता. मात्र ते पुण्याच्या जवळच लपले असल्याचे समोर आले असून एक धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. 

(नक्की वाचा- 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

समोर आलेल्या माहितीनुसार, 16 मे 2025 रोजी वैष्णवी शशांक हगवणे (वय 23) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. सासरच्या मंडळींकडून मारहाण, छळ झाल्याने वैष्णवीने हे टोकाचे पाऊल उचलले. वैष्णवीच्या आत्महत्येनंतर मुख्य आरोपी असलेले राजेंद्र हगवणे त्याचा मोठा मुलगा सुशील हगवणे फरार झाले होते. 

संतापजनक बाब म्हणजे 16 मे रोजी वैष्णवीने आत्महत्या केल्यानंतर फरार झालेल्या हगवणे पिता-पुत्राने मटणावर ताव मारल्याचा एक व्हिडिओही समोर आला आहे. तळेगाव दाभाडे येथील एका हॉटेलवर राजेंद्र हगवणे आपल्या मित्रासोबत मटणावर ताव मारत होता. यावेळी त्यांनी तांबडा- पांढरा रस्साही मागवल्याचे सांगण्यात येत आहे. 

(ट्रेंडिंग बातमी - Vaishnavi Hagavane: 'सासऱ्याने कपडे फाडले, दिराने खाली पाडले' वैष्णवीच्या मोठ्या जावेने सर्वच सांगितलं)

याप्रकरणी वैष्णवी हगवणे यांची सासू लता हगवणे, नणंद करिष्मा हगवणे आणि पती शशांक हगवणे यांना याआधीच अटक करण्यात आली आहे. तसेच वारजे पोलिस ठाण्यात निलेश रामचंद्र चव्हाण, रा. कर्वेनगर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 351(3) आणि शस्त्र कायदा कलम 30 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 19 मे रोजी चव्हाण यांच्या राहत्या घरी मुलाच्या ताब्यासाठी गेलेल्या कासपटे कुटुंबाला त्यांनी धमकी दिल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, आज पहाटे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांनीही स्वतः पोलिसांकडे आत्मसमर्पण केल्याची माहिती समोर आली आहे. आज दुपारी त्यांना कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. या दोघांनाही कडक शिक्षा व्हावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com