Pune News : वैष्णवी हगवणे प्रकरणात IPS अधिकारी सुपेकरांनाही सहआरोपी करा; महिला बालहक्क समितीची शिफारस

सकृतदर्शनी आत्महत्या दिसत असली तरीही हे प्रकरण पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे प्रकरण आहे. त्या दिशेनेच तपास होणे आवश्यक आहे, अशी शिफारस समितीने केली. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Pune News : पुण्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात हगवणे कुटुंबीयांचे निकटवर्तीय असलेले पुण्यातील तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालींदर सुपेकर यांचा हस्तक्षेप तपासादम्यान समोर आला आला आहे. त्यामुळे त्यांना या प्रकरणाच्या तापसापासून दूर ठेऊन सहआरोपी करावे, ही प्रमुख शिफारस महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने केली आहे.

वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी, उणिवा असल्याचे समितीने आपल्या अहवालातून निदर्शनास आणून  दिल्या आहेत. सकृतदर्शनी आत्महत्या दिसत असली तरीही हे प्रकरण पूर्णतः कौटुंबिक हिंसाचार, अत्याचार व हुंडाबळीचे प्रकरण आहे. त्या दिशेनेच तपास होणे आवश्यक आहे, अशी शिफारस समितीने केली. 

(नक्की वाचा-  Jalgaon Politics: ॲड. उज्ज्वल निकम यांची राज्यसभेवर वर्णी; रक्षा खडसेंसाठी धोक्याची घंटा?)

तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांची चौकशी करून त्यांचा सहभाग आढळल्यास त्यांना निलंबित करून सहआरोपी करण्याची आवश्यकता महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समितीने  व्यक्त केली आहे.  जालींदर सुपेकर यांचा सहभाग व हस्तक्षेप समोर आला आल्याने या प्रकरणाच्या तपासापासून सुपेकर यांना दूर ठेवावे, असे समितीने अहवालात म्हटले आहे.

(नक्की वाचा- Anil Parab : गृहराज्यमंत्र्यांच्या आईच्या नावानं मुंबईत डान्सबार, अनिल परब यांचा खळबळजनक आरोप)

समितीच्या अन्य शिफारशी

  • वैष्णवीच्या मुलाचा ताबा कायमस्वरुपी तिच्या आई-वडिलांकडे द्या.
  • राज्य महिला आयोगाला तपासाचा आणि न्यायालयीन अधिकार द्यावा.
  • आयोगावर महिला आयएएस अधिकाऱ्यांची सचिव म्हणून नेमणूक करावी.
  • राज्य महिला आयोगाचा ३५ पदांचा आकृतीबंध ४५ पदांचा करावा.
  • समुपदेशकांसह मानसोपचार तज्ज्ञ उपलब्ध करून द्या.
Topics mentioned in this article