नाताळ निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय म्हणजेच राणीची बाग खुली ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवार दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी राणीची बाग खुली राहणार आहे. तर गुरुवार 26 डिसेंबरला मात्र बंद राहणार आहे. बुधवारी राणीची बाग ही बंद असते. पण त्या दिवशी नाताळ आणि लागून आलेली सुट्टी पाहात प्रशासनाने त्या दिवशी राणीची बाग खुली ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नाताळ म्हणजेच ख्रिसमस निमित्ताने बुधवारी 25 डिसेंबर 2024 रोजी सार्वजनिक सुटी आहे. असे असले तरी त्या दिवशी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेकरिता खुले राहणार आहे. मात्र दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी ते बंद असेल, असे मुंबई महानगरपालिकेकडून कळविण्यात आले आहे.
भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुटीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुटी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.
ट्रेंडिंग बातमी - Year Ender 2024 : ना शाहरुख, ना सलमान, ना अमिर, 'या' कलाकारांनी गाजवले 2024
या ठरावानुसार बुधवारी नाताळ निमित्त वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहणार आहे. त्यामुळे त्या दिवशी बच्चे कंपनी राणीच्या बागेत जाण्याचा आनंद घेवू शकतात. सार्वजनिक सुट्टी असल्याने पालकही त्या दिवशी घरी असणार आहेत. त्यामुळे त्या निमित्ताने तरी त्यांना आपल्या मुलांना राणीच्या बागेत नेता येणार आहे.दरम्यान या निर्णया मुळे बुधवारी राणीच्या बागेत मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता आहे.