जाहिरात

Year Ender 2024 : ना शाहरुख, ना सलमान, ना अमिर, 'या' कलाकारांनी गाजवले 2024

यावर्षात शाहरुख, सलमान, अमिरचे चित्रपट प्रदर्षित झाले नाही. तरही बॉलिवुडमध्ये नव्या दमाच्या स्टार्सनी बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घातला होता.

Year Ender 2024 : ना शाहरुख, ना सलमान, ना अमिर, 'या' कलाकारांनी गाजवले 2024
मुंबई:

बॉलिवूड म्हटलं की आपोआप शाहरुख,सलमान, अमिर, सैफ अली खान यांची नावं आपोआप तोंडावर येता. या कलाकारांचा दबदबा पहायला मिळतो. 2023  हे वर्ष पठाण असेल, जवान असेल किंवा अॅनिमल असेल या व्यावसायिक चित्रपटांनी गाजवले होते. पण 2024 हे त्या पेक्षा वेगळे होते. यावर्षात शाहरुख, सलमान, अमिरचे चित्रपट प्रदर्षित झाले नाही.  तरही बॉलिवुडमध्ये नव्या दमाच्या स्टार्सनी बॉक्सऑफीसवर धुमाकूळ घातला होता. त्यात वर्षाच्या शेवटी प्रदर्शित झालेला दाक्षिणात्य चित्रपट पुष्पा 2 ने तर बॉक्स ऑफीसवरची सर्वच रेकॉर्ड मोडीत काढली. 2024  हे साल बॉलिवूडसाठी कसे होते त्यावर एक नजर टाकूयात. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लापता लेडीजची छाप 

वर्षाच्या सुरूवातील प्रदर्शीत झालेला हा चित्रपत. हा चित्रपट पाच कोटीमध्ये बनला. पण त्यांने बिग बेजेट चित्रपटांनाही मागे सोडत जबरदस्त यश संपादित केले. लापता लेडीज हा  किरण राव दिग्दर्शित कॉमेडी-ड्रामा होता. यात नितांशी गोयल, प्रतिभा रंता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम आणि रवी किशन यांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाला प्रेक्षकांची जबरदस्त पसंती मिळाली. ऐवढच काय तर चित्रपटाने ऑस्करपर्यंत झेप घेतली. यात प्रत्येकाने केलेल्या भूमीकेचं कौतूक झालं. हरवलेल्या पत्नीचा शोध घेणारा पती त्या भोवती फिरणारं कथानक या चित्रपटाचं आहे. 

Latest and Breaking News on NDTV

स्त्री 2 ची ही बॉक्स ऑफीसवर धूम 

स्त्री 2 हा चित्रपट या वर्षातला सर्वात हिट चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात श्रद्धा कपूरसह राजकुमार रावनं आपल्या अभिनयाची प्रेक्षकांना भूरळ घातली. देशात या चित्रपटाने तब्बल 591 कोटीची कमाई केली. तर परदेशातील या चित्रपटाची कमाई 134 कोटी होती. या चित्रपटाने पीके, बाजीराव मस्तानी या चित्रपटाच्या कामाईचे रेकॉर्ड मोडीत काढले. कमाईच्या बाबतीच 2024 मधील दुसऱ्या क्रमांकाचा चित्रपट स्त्री 2 ठरला आहे. शिवाय श्रद्धा कपूरच्या करिअर मधील सर्वाधिक कमाई करणाराही हाच चित्रपट ठरला आहे.

Latest and Breaking News on NDTV

'शैतान' ची जादू चालली 

अजय देवगणची प्रमुख भूमिका असलेल्या शैतान चित्रपटाला ही चांगले यश मिळाले. या चित्रपटाने जागतिक स्तरावर तब्बल 162  कोटींची कमाई केली आहे. हा एक हॉररपट आहे. या चित्रपटात अजय देवगण, ज्योतिका, राजीव खंडेलवाल, कल्की कोचलिन, गुलशन देवय्या, शिव पंडित, नील भूपालम, कीर्ती कुल्हारी, रजित कपूर, पवन मल्होत्रा आणि राजकुमार राव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

'कल्की 2898 एडी'

प्रभासचा बहुचर्चीत कल्की 2898 एडी हा चित्रपट जुन महिन्यात प्रदर्शित झाला. हिंदी बरोबरच तेलगू भाषेत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली.  या चित्रपटाने तब्बल 1100 करोड रुपयांची कमाई केले. शिवाय त्यांनी शाहरुखच्या जवान या चित्रपटाचे कलेक्शनच्या बाबतीत सर्व रेकॉर्ड मोडीत काढले. या चित्रपटसाठी जवळपास 600 कोटी खर्च करण्यात आला होता. या चित्रपटात प्रभास बरोबरच अमिताभ बच्चन, कमल हासन, दिपीका पदुकोण हे स्टार्स झळकले होते.   

Latest and Breaking News on NDTV

अमिर नाही तर लेकाची चर्चा 

अमिर खानने अभिनय केलेला एकही चित्रपट यावर्षी प्रदर्शित झालेला नाही. पण त्याचा मोठा मुलगा जुनैद खान याची जोरदार चर्चा बॉलिवूडमध्ये होते. त्यांना महाराज या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्याच्या अभिनयाची सर्वांनीच प्रशंसा केली. ब्रिटीश काळातील हा चित्रपट असून अंधश्रद्धेला बळी जाणाऱ्या लोकांना मदत करणाऱ्या तरुणाची ही कथा आहे. जुनैदनं अशा पद्धतीचा विषय आपल्या पहिल्या चित्रपटासाठी निवडल्याने त्याचे कौतूक होत आहे. या चित्रपटावरून काही काळ वादही निर्माण झाला होता. काही जण या विरोधात कोर्टातही गेले होते. 

Latest and Breaking News on NDTV

सिंघम अगेन ला अपेक्षित यश नाही 

अजय देवगणचा दिवाळीला प्रदर्शीत झालेला हा चित्रपट. बिग बटेट आणि तगडी स्टारकास्ट असल्यामुळे या चित्रपटाला मोठं यश मिळेल अशी अपेक्षा होती. पण अपेक्षे प्रमाणे या चित्रपटाला यश मिळालं नाही. सिंघम चित्रपटाला जे यश मिळालं त्याची पुनरावृत्ती सिंघम अगेनला करता आली नाही. त्यामुळे अजय देवगणच्या चाहत्यांची निराशा झाली. चित्रपटाला 300 कोटीचाही आकडा गाठता आला नाही. त्यामुळे या चित्रपटाची गणना या वर्षीच्या फ्लॉप चित्रपटात झाली. 

Latest and Breaking News on NDTV

भूल भुलैया 3 चं यश 

दिवाळीच सिंघम अगेन बरोबर प्रदर्शित झालेला दुसरा चित्रपट होता भूल भुलैया 3. कार्तिक आर्यन आणि तृप्ति डिमरी यांचा अभिनय या चित्रपटात आहे. हा एक हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. प्रेक्षकांनी सिंघम अगेन पेक्षा भूल भुलैया 3 पाहण्याला जास्त पसंती दिली. त्यामुळे कमी बजेटमध्ये चित्रपटाने चांगली कमाई केली. कार्तिक आर्यनचा हा त्याच्या करिअरमधील सर्वात यशस्वी चित्रपट ठरला आहे. 

Latest and Breaking News on NDTV

'मुंज्या'वेगळ्या विषयाचा वेगळा चित्रपट 

मुंज्या हा थोड्या वेगळ्या धाटणीचा चित्रपट या वर्षी प्रदर्शीत झाला. कमी बजेटचा हा चित्रपट होता. पण त्याने केलेली कमाई या सर्वांच्या भूवया उंचावायला लावणारी होती. कोकणातल्या लोककथेवर आधारात हा चित्रपट आहे. जवळपास 100 कोटीची कमाई या चित्रपटाने केली. आदित्य सरपोतदार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. सुहास जोशी, रसिका वेंगुर्लेकर या मराठमोळ्या कलाकारांनी यात मुख्य भूमीका केल्या आहेत. 

Latest and Breaking News on NDTV

पुष्पा 2 चं जबरदस्त यश 

वर्षाच्या अखेरीस अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 प्रदर्शीत झाला. या वर्षाचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपटही पुष्पा 2 ठरला आहे. सर्वात मोठा हिट चित्रपट म्हणून याकडेच पाहिले जात आहे. हिंदी बरोबर तेलगू भाषेतही या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर धुमाकूळ घातला आहे. अल्लू अर्जुनला झालेल्या अटकेनंतर तर या चित्रपटावर प्रेक्षकांनी आणखी उड्या घेतल्या. पुष्पा या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनावर गारूड घातलं होतं त्यामुळे पुष्पा 2 ची सर्वांनाच प्रतिक्षा होती. त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Year Ender 2024 : देशाच्या 'या' लेकींनी रचला इतिहास, 2024 गाजवलं!

ट्रेंडिंग बातमी - Year Ender 2024: संघर्ष, कुरघोड्या अन् अस्तित्वाची लढाई! 'या' 10 घडामोडींनी महाराष्ट्राचं राजकारण ढवळलं

ट्रेंडिंग बातमी - Year Ender 2024 : देशाच्या राजकारणातील 5 अनपेक्षित निवडणूक निकाल, ज्याची चर्चा दीर्घकाळ होणार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com