जोरदार पाऊस, त्यात कोसळले भलेमोठे होर्डिंग, अंगावर काटा आणणारा VIDEO

त्यावेळी होर्डिंग खाली असलेल्या गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सकाळी साडे दहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

जाहिरात
Read Time: 2 mins
कल्याण:

कल्याणच्या सदानंद चौकात एक भलं मोठं होर्डिंग पडल्याची घटना घडली आहे. त्यावेळी त्या भागातून कोणी जात नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. मात्र त्यावेळी होर्डिंग खाली असलेल्या गाड्यांचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. सकाळी साडे दहाच्या दरम्यान ही दुर्घटना घडली. यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आलेय   
 

सदानंद चौकात अनेक मोठी होर्डिंग लावण्यात आली आहेत. आज सकाळी कल्याणमध्ये वाऱ्यासह पावसाचा जोर होता. त्याच वेळी एक होर्डिंग अचानक कोसळले. होर्डिंग खाली त्यावेळी एक कार, पाच ते सहा दुचाकी आणि एक रिक्षा आली. त्यात या गाड्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये दोन जण जखमी झाले आहेत. हे होर्डिंग कोसळल्यानंतर त्या भागात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.

('NDTV मराठी'चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

होर्डिंग दुर्घटनेनंतर मनसेचे कार्यकर्ते पडलेल्या होर्डिंगवर ठिय्या आंदोलनाला बसले. जोपर्यंत महापालिका अधिकाऱ्यांवर आणि शहरातील इतर होर्डिंगवर कारवाई होत नाही तोपर्यंत उठणार नसल्याची भूमिका मनसेने घेतली आहे. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष उल्हास भोईर उपस्थित होते. कार्यकर्तेही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर महापालिकेच्या आयु्क्त  इंदुराणी जाखड घटनास्थळी पोहोचल्या. 

Advertisement

ट्रेंडिंग बातमी -  छ. संभाजीनगर आणि धाराशिव नामांतर प्रकरणी याचिका फेटाळली, सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं?

या दुर्घटनेत गाड्यांचे नुकसान झाले. घटनास्थळी पंचनामा करण्यात आला. ठेकेदाराने होर्डिंग लावताना नियमाचे पालन केले नाही . ठेकेदारावर कारवाई करण्यात येइल. असे यावेळी आयुक्तांनी स्पष्ट केले. शिवाय गुन्हा दाखल करण्यात येईल. ठेकेदारामार्फत नुकसानग्रस्तांना भरपाई दिली जाईल, असंही त्या म्हणाल्या. अनधिकृत बेकायदेशीर होर्डिंगवर कारवाई करण्यात येईल. रेल्वेच्या हद्दीत असलेल्या होर्डिंग बाबत रेल्वेला नोटीस बजावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.  संबंधित केडीएमसी अधिकाऱ्यांना देखील कारणे दाखवा नोटीस बजावणार असल्याचं त्या म्हणाल्या. 


 

Advertisement