घरात लग्नाची तयारी, तो जिममध्ये, व्यायाम करताना भयंकर घडलं

सर्वात धक्कादायक म्हणजे विक्रम पारखी यांचे लग्न ठरले होते. येत्या 12 डिसेंबरला त्यांचे लग्न लागणार होते.

जाहिरात
Read Time: 2 mins
पुणे:

सूरज कसबे 

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील एका पैलवानाचा जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाला आगे. विक्रम पारखी असं  मृत पैलवानाचे नाव आहे. तो तीस वर्षाचा होता. विक्रमच्या अकाली निधनाने पुणे कुस्ती क्षेत्रासह मुळशी तालुक्यात शोककळा पसरली आहे. अचानक झालेल्या या घटनेमुळे जिममध्येही खळबळ उडाली. नक्की काय झालं आहे हेच कोणाला त्यावेळी समजलं नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

विक्रम पारखी मुळशी तालुक्यातील माण गावात असणाऱ्या एका खाजगी जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेले होते. मात्र व्यायाम करत असताना अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर ते तिथेच खाली कोसळले. त्यांना तत्काळ पिंपरी चिंचवड येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यावेळी दवाखान्यात घेवून गेलेल्यांना धक्का बसला. बोलता चालता माणून गेल्याने ते हादरून गेले.  

ट्रेंडिंग बातमी - फडणवीस- पवारांचं ठरलं, एकनाथ शिंदेंचे मात्र तळ्यात-मळ्यात

पैलवान विक्रम पारखी यांनी कुमार महाराष्ट्र केसरी हा किताब पटकावला होता. मुळशी तालुक्याच्या  शिरपेचात मानाचा तुरा त्यांनी रोवला होता. विक्रमने अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुद्धा प्रतिनिधित्व करत अनेक पदके मिळवली होती. अनेक मानाच्या गदा सुद्धा त्याने पटकावल्या होत्या. 

ट्रेंडिंग बातमी - पहाटेच्या शपथविधीचा विषय, शिंदे- फडणवीस-पवार खळखळून हसले, पत्रकार परिषदेत काय झालं?

सर्वात धक्कादायक म्हणजे विक्रम पारखी यांचे लग्न ठरले होते. येत्या 12 डिसेंबरला त्यांचे लग्न लागणार होते. त्यामुळं त्यांच्या घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. घरात आनंदाचे वातावरण होते. विक्रमही लग्न होणार म्हणून आनंदी होता. पुढे आपल्या आयुष्यात काय वाढून ठेवलं आहे हे त्यालाही माहित नव्हतं. पण त्यापूर्वीच हा दुःखाचा डोंगर पारखी कुटुंबियांवरती कोसळला. विक्रम याचं अकस्मित निधन झालं. त्यामुळे त्याच्या कुटुंबीयां बरोबरच मुळशी तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. 

Advertisement