महायुती सरकारचा शपथविधी आझाद मैदानात होणार आहे. याची माहिती राजभवनावर महायुतीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही माहिती देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परत एकदा पहाटेच्या शपथविधीचा विषय निघाला. त्याच वेळी राजभवनात एकच हशा पिकला. निमित्त होतं गुरूवारी संध्याकाळी होणाऱ्या शपथविधीचे. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात कोण कोण शपथ घेणार अशी विचारणा होत होती. त्याच वेळी संध्याकाळच्या शपथविधीचा विषय निघाला.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नव्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे असणार की नसणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती. त्याच वेळी पत्रकारांनी एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला. तुम्ही उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही? यावर शिंदे यांनी थोडा धीर धरा असं सांगितलं. त्याच वेळी अजित पवारांनी ते शपथ घेणार की नाही ते संध्याकाळी समजेल. पण मी शपथ घेणार आहे. मी काही थांबणार नाही. असं सांगताच सगळेच जण हसायला लागले. त्याच वेळी एकनाथ शिंदे यांनी मौके पे चौका लगावत, अजितदादांना अनुभव आहे. त्यांनी पहाटे पण शपथ घेतली होती. आता ते संध्याकाळी पण शपथ घेणार आहेत. असं म्हणताच फडणवीस, शिंदे आणि अजित दादाही खळखळून हसू लागले.
ट्रेंडिंग बातमी - फडणवीस- पवारांचं ठरलं, एकनाथ शिंदेंचे मात्र तळ्यात-मळ्यात
पाहाटेचा शपथविधीचे सरकार काही तास टिकले. पण आता पाच वर्षासाठी हे सरकार असेल असं यावेळी अजित पवार म्हणाले. पण या निमित्ताने पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा विषय निघाला. या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरही बऱ्याच दिवसांनी हसू पाहायला मिळाले. या वेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही. गेल्या काही दिवसापासून महायुतीत कुरघोड्या सुरू असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या सध्या शाब्दीक चकमकी होत आहेत. त्यात आता याच पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी एकमेकांना सगळ्यां समोरच चिमटे काढले.
ट्रेंडिंग बातमी - फडणवीस करणार आपल्या नावावर अनोखं रेकॉर्ड, जे भुजबळ,आबा, दादांना जमलं नाही ते...
दरम्यान काहीच कन्फ्युजन राहाणार नाही. सर्व काही स्पष्ट होईल. थोडा धीर धरा. असं शेवटी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आझाद मैदानात महायुतीच्या सरकारचा शपथ विधी होणार आहे. त्यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेतील. काही मंत्री ही शपथ घेणार असल्याची चर्चा आहे. मात्र त्यांची संख्या किती असेल याचा निर्णय आज रात्रीपर्यंत होण्याची शक्यता आहे. शिवाय एकनाथ शिंदे हे स्वत: मंत्रिमंडळात असणार की नाही हे पण स्पष्ट होणार आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world