Vishalgad : विशाळगड परिसरातील नव्या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचं नाव

इतिहासात विविध घडामोडींनी गाजलेल्या विशाळगड परिसरात एका नव्या वनस्पतीचा शोध लागला आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
कोल्हापूर:

विशाळगडाचा परिसर जैवविविधतेने नटलेला आहे. अनेक दुर्मीळ वनस्पती या परिसरात आढळतात. एका संशोधकाने येथील नव्या वनस्पतीचा शोध घेतला आहे. आणि त्याहूनही विशेष म्हणजे या नव्या वनस्पतीला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्यात आलंय. शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यासगटाने याच संशोधन केलंय. इतिहासात विविध घडामोडींनी गाजलेल्या विशाळगड परिसरात एका नव्या वनस्पतीचा शोध लागला आहे. 

शोध लावणाऱ्या संशोधकांनी या वनस्पतीला छत्रपती शिवरायांचं नाव दिलं आहे. ही वनस्पती कंदीलपुष्प कुळातील आहे. कोल्हापुरातील वनस्पती अभ्यासकांनी विशाळगड परिसरात आढळून आलेल्या या नव्या प्रजातीला 'सेरोपेजिया शिवरायीना' असं नाव दिलंय. जैवविविधता या विषयावर किल्ल्यांवर संशोधन करणारे फार कमी जणं भेटतात. कोल्हापुरातल्या या संशोधकांनी मात्र गडकिल्ल्यांवरील वनस्पतींचा शोध घेण्यास सुरुवात केली. यामुळेच दुर्मीळ प्रजाती आणि नवीन प्रजाती आता समोर येऊ लागल्या आहेत.



गेल्या पाच वर्षांपासून हा संशोधक विद्यार्थी वनस्पतींचा अभ्यास करत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील 13 किल्ल्यांवर संशोधनाचं काम सुरू आहे. या संशोधन कार्यकाळात 2023 मध्ये ही नवी वनस्पती आढळून आली आहे. 

नक्की वाचा - बीडच्या भूमिपुत्राने ऑलिम्पिक गाजवलं; अविनाश देशाला गोल्ड मेडल मिळून देईल, वडिलांचा विश्वास

फायटोटॅक्स आंतरराष्ट्रीय नियतकालिकेत संशोधनाचा एक निबंध प्रकाशित झाला आहे. विशाळगड परिसरात सापडलेल्या नवीन प्रजातीच एक कंदीलपुष्प कुळ खाण्यायोग्य अशी वनस्पती असते. ज्याप्रमाणे आलं, बटाटे या वनस्पती आहेत. त्याचप्रमाणे सेरोपेजिया शिवरायीना ही वनस्पती आहे. मात्र ही एक नवीन वनस्पती असल्याने खाण्या योग्य नाही. ही एक वेलवर्गीय वनस्पती आहे. सध्या या नव्या वनस्पतीचा शोध लागल्यामुळे यावर आणखी संशोधनाचं काम सुरू आहे.

Advertisement

गेल्या पाच वर्षांपासून गड किल्ल्यांवर संशोधन करणारे अभ्यासक नवनवीन वनस्पतींचा शोध घेत आहेत. अनेक दुर्मीळ प्रजाती यांना आढळून आलेले आहेत. विशाळगड परिसरात सापडलेल्या नव्या वनस्पतीला आंतरराष्ट्रीय स्तरावरही प्रसिद्धी मिळालेली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या डॉ. एस आर यादव या अभ्यासगटाने यावर संशोधन करून याचा शोध लावलेला आहे. संशोधक अक्षय जंगम, रतन मोरे आणि डॉक्टर निलेश पवार यांचे यासाठी विशेष योगदान आहे. छत्रपती शिवरायांच्या नावानं ओळखली जाणारी सेरोपेजिया शिवरायीना पाहण्याची अनेकांना उत्सुकता आहे.