Vivah Muhurta : नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात केवळ 8 लग्न मुहूर्त; 2026 मधील शुभ मुहूर्तांची संख्या घटली

पुढील वर्षी लग्नाचे मुहूर्त कमी असल्याने लग्न सभागृह बुकिंग, खरेदी, जेवण आदी तयारी आधीच करावी लागणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

Wedding date in December : तुळशी विवाह पार पडल्यानंतर घराघरांमध्ये लग्नाची तयारी सुरू होते. यासाठी लग्नाचे मुहूर्तही पाहिले जातात. दरम्यान डिसेंबर महिन्यात केवळ आठच लग्न मुहूर्त असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे नव्या वर्षात २०२६ मध्ये (Vivah Muhurta 2026) केवळ ४९  मुहूर्त आहेत. याचा फटका इतर गोष्टीवर पडण्याची शक्यता आहे. (Wedding date in New Year 2026)

२२ नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये लग्नाचे मुहूर्त कधी?

डिसेंबर महिन्यात केवळ ८ लग्नाचे मुहूर्त असल्याने लग्न कार्यालय आणि त्यासंबंधित इतर गोष्टींची मागणी वाढण्याची शक्यता आहे. २२ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या काळात २२, २४, २५, २७, २९ नोव्हेंबर आणि ३, ५ डिसेंबर असे आठ दिवस लग्नासाठी शुभकाळ असणार आहे.  

२०२६ मध्ये केवळ ४९ शुभ मुहूर्त का?

अधिक मास, ग्रहण, मलमास आणि चांद्रमास यातील विसंगतीमुळे शुभ दिवसांची संख्या घटल्याचं सांगितलं जात आहे. २०२६ मध्ये फेब्रुवारी ते जुलै महिन्यापर्यंत बहुतेक मुंज आणि विवाह पार पडतील. ग्रहस्थिती आणि अधिक मासामुळे विवाहासाठीच्या मुहूर्ताची संख्या घटली आहे. जानेवारी महिन्यात मलमास आणि मे-जूनमध्ये अधिक मास असल्याने थोडी उसंत मिळेल. लोकमतने यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध केली आहे. 

नक्की वाचा - लाखोंचे दागिने घालून परफ्यूम मारता..एका चुकीमुळे होईल मोठं नुकसान! प्रियांका चोप्रासोबत काय घडलं? बघा जरा

२०२६ मधील लग्नाचे मुहूर्त 

फेब्रुवारी 2026: 
5, 6, 8, 10
16 (रोहिणी नक्षत्र)
24 (रोहिणी नक्षत्र)
25 (रोहिणी नक्षत्र)
26 (मृगशिरा नक्षत्र)

Advertisement

मे 2026: 
1, 3, 5, 6, 7, 8, 13, 14, 23, 25, 26, 28, 29.

जून 2026: 
19 ते 30 पर्यंत
21, 22, 23, 24
25, 26, 27, 29

जुलै 2026: 
1, 2
6, 7, 8
11, 12

नोव्हेंबर 2026: 
20
21
24, 25, 26, 27
30