वडाळा- CSMT स्थानकादरम्यान लोकलचा डबा घसरला, हार्बर मार्ग विस्कळीत

लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गावरील लोकल मस्जिदपर्यंत तर काही लोकल वडाळ्यापर्यंत मर्यादित करण्यात आल्या आहेत.

जाहिरात
Read Time: 1 min
मुंबई:

पनवेलहून CSMT च्या दिशेने जाणाऱ्या लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील लोकलचा डबा घसरला. ही घटना सकाळी 11.35 मिनिटांनी घडली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र लोकल वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. लोकल बराच वेळ एकाच जागेवर उभी असल्याने प्रवासी ट्रॅकवर उतरून चालत असल्याचं दिसून आलं. काही काळासाठी हार्बर मार्गावरील लोकल ठप्प झाली होती. दरम्यान सध्या धीम्या गतीने लोकल सुरू झाल्याची माहिती समोर आली आहे. 

Advertisement

लोकलचा डबा घसरल्याने हार्बर मार्गावरील लोकल मस्जिदपर्यंत तर काही लोकल वडाळ्यापर्यंत मर्यादित करण्यात आल्या आहेत. पुढील काही वेळात लोकल सेवा पूर्ववत होतील अशी माहिती सेंट्रल रेल्वेकडून देण्यात आली आहे.  

बातमी अपडेट होत आहे. 


Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world