रेवती हिंगवे, पुणे
गुईलेन बॅरे सिंड्रोमने राज्यभर हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केली आहे. पुण्यानंतर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 13 नागरिकांचा जीबीएसमुळे मृत्यू झाला आहे. मात्र हा आजा नेमका कशामुळे होते याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आहेत. हा संसर्गजन्य आजार नसल्याचं माजी IMA चे अध्यक्ष, वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
डॉ.अविनाश भोंडवे यांनी म्हटलं की, GBS हा रोग कुठल्याही जंतूपासून किंवा बॅक्टेरिया आणि व्हायरसपासून होत नाही. काही विषाणू अन्नपदार्थांतून आपल्या शरीरात गेल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. दूषित पाणी, दूषित अन्न किंवा दूषित मांसाहर याच कारणामुळे GBS आजार होतो हे निष्पन्न झालं आहे.
(नक्की वाचा- Shocking VIDEO : नवरी वाट पाहत राहिली, नवरदेवाचा मंडपातच हार्ट अटॅकने मृत्यू)
मात्र केवळ मांसाहार खाल्ल्यानेच जीबीएस आजार होतो असं बोलणं वावगं ठरेल. काही अंशी ते खरं देखील आहे. दूषित मांस किंवा उघड्यावरचे अन्न खाणे टाळावे. जीबीएस होऊ नये म्हणून केवळ शिजवलेलं मांस खा, असा सल्ला देखील डॉ.अविनाश भोंडवे यांनी केलं आहे.
चिकनमुळे जीबीएसची लागण होते का?
जर जीबीएसचे विषाणू कोंबड्यांमध्ये असेल तरच माणसाला याची लागण होऊ शकते. पण प्रत्येक कोंबडी खाणाऱ्याला याची लागण होईलचं असं नाही. GBS विषाणूमुळे प्रत्येक व्यक्तीला हा आजार होईल असं नाही, असं देखील डॉ.अविनाश भोंडवे यांनी स्पष्ट केलं.
पुण्यात आतापर्यंत जीबीएसमुळे 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. तर नागपूर, सांगलीत प्रत्येक दोन तर मुंबई, कोल्हापुरात प्रत्येकी एका रुग्णााचा मृत्यू झाला आहे.
(नक्की वाचा- Panvel News: मधमाशांनी घात केला; कर्नाळा किल्ला फिरायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू)
आजाराची सर्वसाधारण लक्षणे
- अचानक पायात किंवा हातात अशक्तपणा किंवा लकवा येणं.
- अचानकपणे चालण्यातील त्रास किंवा अशक्तपणा जाणवणे.
- डायरिया (जास्त दिवसांचा)
नागरिकांनी काय काळजी घ्यावी?
- पिण्याचे पाणी दुषित राहणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी पाणी उकळून घेणे.
- अन्न स्वच्छ आणि ताजे असावे.
- वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा.
- शिजलेले अन्न आणि न शिजलेले अन्न एकत्रित ठेवणं टाळावे.
- नागरिकांनी घाबरुन जाण्याची गरज नाही. लक्षणे आढळल्यास जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा