जाहिरात

Shocking VIDEO : नवरी वाट पाहत राहिली, नवरदेवाचा मंडपातच हार्ट अटॅकने मृत्यू

Heart Attack News: घोड्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एकाने प्रदीप यांना पकडले. आराडाओरडा झाल्याने सर्व नातेवाईक जमले. प्रदीप यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले. 

Shocking VIDEO : नवरी वाट पाहत राहिली, नवरदेवाचा मंडपातच हार्ट अटॅकने मृत्यू

Groom Death by Heart Attack: तरुणांमध्ये वाढतं हृदयविकाराचं प्रमाण चिंतेचा विषय आहे. चालता फिरता लोकांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन होतं, असे अनेक व्हिडीओ देखील समोर आली आहे. असाच एक मन हेलावणारा व्हिडीओ समोर आहे. घोड्यावर बसलेल्या नवरदेवाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशच्या शेओपूरमधील ही घटना आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

प्रदीप जाट असं मृत नवरदेवाचं नाव आहे. प्रदीप एनएसयूआयचे माजी जिल्हाध्यक्ष होते. लग्नाची मिरवणूक निघत असताना प्रदीप घोडीवर बसले होते. एकीकडे बँड वाजत होता. वऱ्हाडी नाचत होते. मात्र प्रदीप यांची अचानक तब्येत बिघडली आणि त्यांचा तोल जाऊ लागला. घोड्याच्या बाजूला उभ्या असलेल्या एकाने प्रदीप यांना पकडले. आराडाओरडा झाल्याने सर्व नातेवाईक जमले. प्रदीप यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांना त्यांना मृत घोषित केले. 

(नक्की वाचा- Panvel News: मधमाशांनी घात केला; कर्नाळा किल्ला फिरायला गेलेल्या पर्यटकाचा मृत्यू)

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशीची ही घटना आहे. प्रदीप जाट यांचे 14 फेब्रुवारी रोजी लग्न होणार होते. लग्नाची मिरवणूक आली होती. सगळी तयारी देखील झाली होती. दरम्यान, व्हिडिओमध्ये असे दिसून येतंय की नवरदेव आधी जवळ उभ्या असलेल्या एका व्यक्तीला त्याची तलवार देतो आणि त्याला घोड्यावरून खाली उतरण्याची तयारी करतो. 

(नक्की वाचा - Ex MLA Death : किरकोळ कारणावरुन वाद, रिक्षा चालकाच्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू)

दरम्यान  नवरदेवाला अचानक अस्वस्थ वाटते आणि तो हळूहळू घोड्यावर पुढे झुकतो. जवळ उभे असलेल्या लोकांना काही समजण्यापूर्वीच अचानक लोक त्या दिशेने धावू लागले आणि घाईघाईत वराला घोड्यावरून खाली उतरवतात. मात्र लग्नाच्या दिवशीच प्रदीप जाट यांचा मृत्यू झाल्याने दोन्ही कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: