गौरी गर्जेंच्या मृत्यूच्या काही मिनिटांपूर्वी काय घडलं? अनंत गर्जेनी पोलिसांना सगळं सांगितलं

पती अनंत गर्जे यांच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याची मागणी माहेरच्या मंडळीनी केली. यावेळी मोहोज देवढे गावात तणाव निर्माण झाला होता. गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins

Dr Gauri Garje Death Case: राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक (पीए) अनंत गर्जे यांच्या पत्नीने मुंबईत राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अनंत गर्जेंना अटक करण्यात आली आहे. 

अंनत गर्जे यांना पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्येच्या काही मिनिटापूर्वीच गौरी आणि अनंत यांचे भांडण झाले होते. या भांडणानंतर अनंत हे पंकजा मुंडे यांच्या कार्यक्रमानिमित्त घराबाहेर पडले होते. अनंत गर्जेंची गाडी कोस्टल रोडला असताना गर्जे वारंवार गौरी यांना फोन करत होते. मात्र गौरी यांनी फोन उचलला नाही. याच संशयातून अनंत यांनी गाडी पुन्हा घराकडे वळवली.

घरी आल्यानंतर अनंत यांनी जोरजोरात दरवाजा ठोठावला, मात्र आवाज देऊनही गौरी यांनी दार उघडलं नाही. आतून कुठलीही प्रतिक्रिया मिळत नसल्याने अनंत यांनी खिडकीतून डोकावले असता, पत्नीने गळफास घेतल्याचे पाहिले. पोलीस चौकशीत अनंत यांनी ही सविस्तर माहिती दिली.

अनंत गर्जेंच्या घरी तपासणी

अनंत गर्जे यांच्या राहत्या घरी देखील पोलिसांची आणि डॉक्टरांची तुकडी दाखल झाली. गौरी हिच्या आत्महत्या संदर्भात अजून काही पुरावे गोळा करता येतात का याची चाचपणी करण्यासाठी पोलीस इथे दाखल झाले आहेत.

Advertisement

(नक्की वाचा-  Dr Gauri Garje Death Case: मोठी बातमी! गौरी गर्जे आत्महत्या प्रकरण: पंकजा मुंडेंच्या पीएला अटक)

"… श्रीमंताला मुलगी देऊ नका"

गौरी यांचा मृतदेह त्यांच्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील देवडे गावात अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. पार्थिवासमोर गौरीच्या वडिलांनी हंबरडा फोडत “जर तुम्हाला मुलगी असेल तर मला न्याय द्या… श्रीमंताला मुलगी देऊ नका,” अशी भावना व्यक्त केली. यावेळी नातेवाईक आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.

पालवे आणि गर्जे कुटुंबीय आमने-सामने

पती अनंत गर्जे यांच्या घरासमोर अंत्यसंस्कार करण्याची मागणी माहेरच्या मंडळीनी केली. यावेळी मोहोज देवढे गावात तणाव निर्माण झाला होता. गर्जे आणि पालवे यांच्या नातेवाईकांमध्ये बाचाबाची झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर समज काढून परिस्थिती नियंत्रणात आणली.

Advertisement

Topics mentioned in this article