जाहिरात

ती 42 वर्ष जिवंत प्रेत म्हणून जगत होती....अरुणा शानबाग केस काय आहे? सध्या का होतीय चर्चा?

Aruna Shanbag Case : कोलकातामधील मुलीसोबत हॉस्पिटलमध्ये जे पाशवी कृत्य झाले त्यानंतर मुंबईत 51 वर्षांपूर्वी घडलेल्या अरुणा शानबाग प्रकरणाच्या आठवणी जाग्या झाल्या.

ती 42 वर्ष जिवंत प्रेत म्हणून जगत होती....अरुणा शानबाग केस काय आहे? सध्या का होतीय चर्चा?
Aruna Shanbag : मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 51 वर्षांपूर्वी भयंकर प्रकार घडला होता.
मुंबई:

कोलकातामधील आरजी कर हॉस्पिटलमध्ये 8-9 ऑगस्टच्या रात्री ट्रेनी डॉक्टरवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा 27 नोव्हेंबर 1973 रोजी घडलेल्या त्या भयंकर घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या आहेत. कोलकातामधील मुलीसोबत हॉस्पिटलमध्ये जे पाशवी कृत्य झाले (Kolkata Rape And Murder Case) तसंच मुंबईच्या किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घडलं होतं. त्यामध्ये फरक इतकाच आहे की यावेळी जिच्यावर अत्याचार झाले त्या डॉक्टरचा मृत्यू झाला. तेंव्हा एक नर्स या अत्याचाराला बळी पडली. ती यामध्ये दगावली नाही. पण, 42 वर्ष जिवंत लाश म्हणून जगली. सर्वोच्च न्यायालयानं देखील डॉक्टरांच्या सुरक्षेवर काळजी व्यक्त करताना अरुणा शानबाग केसचं (Aruna Shanbag Case) उदाहरण दिलं आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे अरुणा शानबाग केस?

अरुणा शानबाग या नर्सची ही गोष्ट आहे. अरुणावर हॉस्पिटलमध्ये सोहनलाल वाल्मिकी या वॉर्डबॉयनं फक्त बलात्कारच केला नाही तर त्यानं राक्षसीपणाच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. त्यामुळे अरुणा जिवंत तर राहिली पण एक मृतदेह बनून तिनं उर्वरित सर्व आयुष्य घालवलं.

बलात्कार केल्यानंतर आपण पकडले जाऊ या भीतीनं सोहनलालनं कुत्र्याच्या चेननं अरुणाचा गळा दाबला. त्यामुळे अरुणाचा मृत्यू होईल आणि त्याचं नीच कृत्य कुणालाही समजणार नाही, असं त्याला वाटलं होतं. पण अरुणा जिवंत होती. शारीरिक आणि मानसिक पातळीवर इतके पाशवी अत्याचार सहन केल्यानंतरही अरुणा वाचली. पण, ती कोमामध्ये गेली. त्यानंतर पुढची 42 वर्ष ती जिवंत प्रेत होती. 

Latest and Breaking News on NDTV

नर्सबरोबर काय झालं?

मुंबईच्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 51 वर्षांपूर्वी नर्स अरुणा शानबाग आजच्या कोलकाता डॉक्टरसारखीच शिकार झाली होती. अरुणाचं हॉस्पिटलमधील एका डॉक्टरबरोबर लग्न होणार होता. पण, विधिलिखत काही दुसरं होतं... 

लग्नाच्या एक महिना आधी कुणीही कल्पना केली नसेल ते अरुणाच्या बाबतीमध्ये घडलं. तिच्यावर फक्त बलात्कार झाला नाही तर कुत्र्याच्या चेननं तिचा गळा दाबून तिला मारण्याचा प्रयत्न झाला. पण, त्यामध्ये तिला मरण आलं नाही. 

अरुणाला इच्छामृत्यू का मिळाला नाही?

अरुणाला इच्छामृत्यू देण्याच्या मागणीसाठी काही जण कोर्टात गेले होते. पण, कोर्टानं तिला इच्छामृत्यू नाकारला. सर्वोच्च न्यायालयानं 2011 साली बलात्कार पीडितेला याची परवानगी मिळणार नाही, तिला जगावं लागेल असं स्पष्ट केलं. हा निर्णय घेण्यापूर्वी कोर्टानं अरुणाचं मेडिकल चेकअप करुन घेतलं. त्यानंतर अरुणाला स्वत:ला काय हवंय हे तपासणं अवघड आहे, असं कोर्टानं सांगितलं. पण, स्टाफबरोबरचं तिचं वागणं पाहाता तिला आणखी जगायचं आहे, तिचं जगण्यावर प्रेम आहे, असं स्पष्ट होतं असं कोर्टांनं म्हंटलं होतं.

Latest and Breaking News on NDTV

तब्बल 42 वर्ष मानसिक आणि शारीरिक त्रास सहन केल्यानंतर 2015 साली अरुणा शानबागचा मृत्यू झाला. 

( नक्की वाचा : नर्सला ओलीस ठेवून डॉक्टरनं केलं भयंकर कृत्य, हॉस्पिटलमध्येच घडला सर्व प्रकार )
 

आरोपीला मिळाली फक्त 7 वर्षांची शिक्षा

अरुणा शानबाग प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे तिच्यावर हे सर्व अत्याचार करणाऱ्या आरोपीला फक्त 7 वर्षांची शिक्षा झाली. तो 1980 साली जेलमधून बाहेर आला. त्यानंतर नवं नाव आणि ओळख बदलून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नोकरी करत होता.

आरोपी सोहनलालनं एका मुलाखतीमध्ये त्यानं अरुणाबरोबर जे केलं त्याचा पश्चाताप होत असल्याचं म्हंटलं होतं. मी याबाबत देवाची माफी मागतो. माझी एक मुलगी होती, तिचा मृत्यू झाला. माझ्या चुकीची शिक्षा मला परमेश्वरानं दिली, असं त्यानं सांगितलं होतं. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Previous Article
CM एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर गुन्हे दाखल करा, काँग्रेसची पोलिसात तक्रार
ती 42 वर्ष जिवंत प्रेत म्हणून जगत होती....अरुणा शानबाग केस काय आहे? सध्या का होतीय चर्चा?
Block road on Nashik Gujarat Highway since 12 hours Rasta roko
Next Article
गेल्या 12 तासापासून रास्ता रोको, वाहनांच्या लांबच लांब रांगा, नाशिक गुजरात हायवेवर काय झालं?