VIDEO : रीलच्या नादात कार दरीत कोसळली; 23 वर्षीय तरुणीचा मृत्यू

मोबाईलवर रील्स बनवण्यासाठी तरुणीने कार चालवण्यासाठी घेतली. कार चालवताना रिव्हर्स गिअर पडून अॅक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली कोसळली.

Advertisement
Read Time: 2 mins

इन्स्टाग्राम रीलच्या नादात तरुणीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना समोर आली आहे. रील बनवताना कार दरीत कोसळून हा अपघात झाला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथील सुलीभंजन दत्त मंदिराजवळ ही घटना घडली आहे. 

श्वेता दिपक सुरवसे (23 वर्ष) असं मृत तरुणीचं नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, श्नेता व तिचा मित्र शिवराज मुळे (वय 25 वर्ष) हे छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या कारने सोमवारी सुलीभंजन येथील दत्त मंदिर परिसरात दुपारी आले होते. मंदिराचा परिसर विहंगम असून पावसाळ्यात निसर्गाचं सौंदर्य अधिक खुलत. यावेळी त्यांनी तिथे रील्स शूट करण्याचं ठरवलं.  

(नक्की वाचा-  दारुडे वडील, आईने घर सोडलं; 3 अल्पवयीन बहिणींसोबत भयंकर घडलं)

मोबाईलवर रील्स बनवताना श्वेताने कार चालवण्यासाठी घेतली. कार चालवताना रिव्हर्स गिअर पडून अॅक्सलेटवर दाब पडल्याने कार थेट डोंगरावरुन खाली कोसळली. या घटनेत तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर कार दरीत कोसळल्यानंतर कारचा अक्षरश: चक्काचूर झाला. 

Advertisement

(नक्की वाचा- iphone च्या एका फीचरमुळे मोडलं लग्न; व्यक्तीने कंपनीविरोधात ठोकला दावा)

या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. व्हिडीओमध्ये तरुणी कारमध्ये बसलेली दिसत आहे. तर कार हळूहळू मागे जाताना दिसत आहे. मात्र अचानक तरुणीची पाय अॅक्सलेटरवर पडल्याने कार वेगात मागे जाते. यावेळी शिवराज क्लच क्लच असं ओरडताना देखील व्हिडीओत ऐकू येत आहे. अशारितीने एका रीलमुळे तरुणीचा जीव गेला आहे. मात्र कठडे असते तर ही घटना घडली नसती, अशी चर्चा सुरु आहे.

Topics mentioned in this article