जाहिरात
Story ProgressBack

दारुडे वडील, आईने घर सोडलं; 3 अल्पवयीन बहिणींसोबत भयंकर घडलं

पेल्हार पोलिसांनी आरोपी दत्ता क्षीरसारगर (35), निशाद खान (19) आणि सय्यद अशा 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात IPC च्या कलम 376, 376 (2) (एन), 376 (3) सह पोक्सो 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read Time: 2 mins
दारुडे वडील, आईने घर सोडलं; 3 अल्पवयीन बहिणींसोबत भयंकर घडलं
प्रतिकात्मक फोटो

मनोज सातवी, वसई

व्यसनाधीन वडिलांमुळे 3 अल्पवयीन बहिणींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.  त्यातील एक बहीण गरोदर राहिल्याचं देखील उघड झालं आहे. दारूच्या व्यसनामुळे वडील आईला नेहमी मारहाण करत असल्याने ती वडील आणि मुलींना सोडून गेली होती. तसेच मुलींना देखील त्यांचे वडील मारहाण करत होते. त्यातूनच या मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत वेगवेगळ्या आरोपींकडून या मुलींवर मागील एक वर्षांपासून लैंगिक अत्याचार केले गेले.

याप्रकरणी पेल्हार पोलिसांनी आरोपी दत्ता क्षीरसारगर (35), निशाद खान (19) आणि सय्यद अशा 3 आरोपींना अटक केली आहे. त्यांच्या विरोधात पेल्हार पोलीस ठाण्यात IPC च्या कलम 376, 376 (2) (एन), 376 (3) सह पोक्सो 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीनही आरोपींना 20 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 

(नक्की वाचा : कांचनजुंगा एक्सप्रेस व मालगाडीची धडक कशी झाली? एकावर एक चढले ट्रेनचे डबे, अपघाताची भीषणता दाखवणारे PHOTOS)

नालासोपार्‍यात राहणाऱ्या अवघ्या 14, 16 आणि  17 वर्षीय 3 अल्पवयीन बहिणींवर अत्याचार झाले आहेत. वडील दारूच्या व्यसनामुळे वैतागून त्यांची आई घर सोडून गेली होती. व्यसनाधीन बाप त्याच्या मुलींना देखील मारहाण करत होता. वडिलांच्या त्रासाला कंटाळून मागील वर्षी या तिघांपैकी एक 17 वर्षांची मुलगी घरातून निघून गेली होती. 

(नक्की वाचा - नागपुरात पुन्हा हिट अँड रन प्रकरण, 9 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू)

त्यावेळी दत्ता क्षीरसारगर (35) या आरोपीने आसरा देण्याच्या बहाण्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्यानंतर तिला भेटण्यासाठी तिच्या दोन लहान बहिणी देखील तिच्याकडे जात होत्या. त्यावेळी नराधम क्षीरसागर याने आणखी एका बहिणीवर बलात्कार केला. तसेच त्याचे दोन साथीदार निशाद खान आणि सय्यद दोघांनी देखील या अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केले. गेल्या वर्षापासून हे अत्याचाराचे सत्र सुरू होते.  यातून एक 16 वर्षीय अल्पवयीन पीडित मुलगी गर्भवती देखील राहिली आहे. 

घटनेची माहिती मिळताच पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी विशेष पथकाच्या मदतीने तीनही नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस अधिक तपास करत आहे. 
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Switch To Dark/Light Mode
Our Offerings: NDTV
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • इंडिया
  • मराठी
  • 24X7
Choose Your Destination
Previous Article
नागपुरात पुन्हा हिट अँड रन प्रकरण, 9 जणांना चिरडले; दोघांचा मृत्यू
दारुडे वडील, आईने घर सोडलं; 3 अल्पवयीन बहिणींसोबत भयंकर घडलं
people of Satara in fear due to drone cameras police investigation going on
Next Article
साताऱ्यात आकाशात घिरट्या घालणाऱ्या ड्रोनची भानगड काय? नागरिक धास्तावले, पोलिसांकडून शोध सुरु
;