Mamta Kulkarni: ममता कुलकर्णीला दिक्षा देणारी लक्ष्मी कोण? काय आहे ठाणे कनेक्शन?

आचार्य लक्ष्मी त्रिपाठी या सध्या किन्नरांसाठी काम करत आहे. याच लक्ष्मी सलमान खानच्या बीग बॉस सिजन 5 मध्ये स्पर्धक होत्या.

जाहिरात
Read Time: 2 mins
प्रयागराज:

प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णी ही महाकुंभात  किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. याची घोषणा किन्नर आखाड्याच्या आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केली. या पुढे ममता कुलकर्णी ही श्री यामाई ममता नंद गिरी या नावाने ओळखली जाणार आहे असंही लक्ष्मी यांनी यावेळी स्पष्ट केलं. शिवाय जी दिक्षा द्यायची असते ती ही लक्ष्मी यांनी यावेळी ममता यांना दिली. त्यापूर्वी ममतानं त्रिवेणी संगमात स्वत:चं पिंडदान केलं.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

महामंडलेश्वर झाल्यानंतर ममता कुलकर्णीची सगळीकडेच चर्चा आहे. त्याच वेळी तिला दिक्षा देणाऱ्या आणि महामंडलेश्वर म्हणून घोषीत करणाऱ्या लक्ष्मी त्रिपाटी यांचीही चर्चा होवू लागली आहे. या लक्ष्मी त्रिपाटी यांचे महाराष्ट्र कनेक्शन ही समोर आलं आहे. शिवाय ठाणे शहराबरोबर त्याचं अनोख नातंही आहे. आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी या किन्नर आखाड्याच्या पहिल्या महामंडलेश्वर झाल्या होत्या. तेव्हा पासून त्यांनी आध्यात्माला वाहून घेतलं आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Mamta Kulkarni : ममता कुलकर्णी बनली किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर, महाकुंभात केले पिंडदान, Video

लक्ष्मी त्रिपाठी यांचा जन्म 13 डिसेंबर 1978 साली झाला होता. त्यांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. ठाणे शहरात त्या एका ब्राम्हण कुटुंबात जन्माला आल्या. त्यांनी पुढे नृत्य क्षेत्रात शिक्षण घेतलं. त्या त्यावर थांबल्या नाहीत. नृत्याची आवड त्यांना भरतनाट्यमकडे ओढत घेवून गेली. त्यात त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्य करायला सुरूवात केली. किन्नर समाजाला समानतेचा हक्क मिळावा यासाठी त्यांनी लढा उभा केला होता. 

ट्रेंडिंग बातमी - Amit Shah: 'फक्त नेता होऊन भागत नाही, जमिनीवर काम करावं लागतं' पवारांना शहांनी पुन्हा डिवचलं

'मी हिजडा, मी लक्ष्मी' हे त्याचं पुस्तक खुप गाजलं. त्यांनी लिहीलेल्या या पुस्तकाची चर्चा सगळीकडेच झाली. त्यातून किन्नर समाजाच्या यातना समोर आल्या. नंतर त्या आध्यात्माकडे ओढल्या गेल्या. ऋषी अजयदास यांनी 2015 यावर्षी किन्नर आखाड्याची स्थापना केली होती. याला आखाडा परिषदेनेही मान्यता दिली. पुढे अजय दास यांनी लक्ष्मी त्रिपाठीयांना महामंडलेश्वर बनवलं. त्यानंतर आचार्य लक्ष्मी यांना 5 शहरातून आलेल्या किन्नरांनीही त्यांना पीठाधीश्वर म्हणून मान्यता दिली. 

ट्रेंडिंग बातमी - Pipmri Chinchwad Crime: 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, रीलस्टार मैत्रिणीच्या 3 मित्रांना अटक

आचार्य लक्ष्मी त्रिपाठी या सध्या किन्नरांसाठी काम करत आहे. याच लक्ष्मी सलमान खानच्या बीग बॉस सिजन 5 मध्ये स्पर्धक होत्या. शिवाय सच का सामना आणि दस का दम मध्येही त्यांनी सहभाग नोंदवला होता.  किन्नर आखाड्याची स्थापना 2015 साली करण्यात आली. ही एक हिंदू धर्माची संघटना आहे. तृतीयपंथीय समुदायातील व्यक्तींना आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात समानता आणि मान्यता देणे हा या आखाड्याचा मुख्य उद्देश आहे. आता ममता कुलकर्णीची या आखाड्याच्या महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यामुळे या आखाड्याला त्यांचा संदेश अधिक वेगानं पसरवण्यासाठी मदत होणार आहे. 
 

Advertisement