केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातला कलगीतुरा संपण्याचा नाव घेत नाही. अमित शहा हे मालेगावच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना लक्ष्य केलं. शरद पवार हे दहा वर्ष केंद्रात कृषी मंत्री होते. त्यांच्याकडे सहकार मंत्रालय ही होते. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा खडा सवाल अमित शहा यांनी पुन्हा एकदा शरद पवारांना केला. यावेळी एकेकाळचे शरद पवारांचे सहकारी छगन भुजबळही व्यासपिठावर उपस्थित होते. शहा ज्यावेळी पवारांबद्दल बोलत होते त्यावेळी भुजबळ त्यांच्याकडे पहातच राहीले.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
मालेगावच्या कार्यक्रमात बोलताना अमित शहा आधी शेती आणि सहकारावर बोलले. पण भाषणाच्या शेवटी त्यांनी आपला मोर्चा शरद पवारांकडे वळवला. ते म्हणाले शरद पवारांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यांना उत्तर द्यावं लागेल. पवार साहेब आपण 10 वर्ष कृषी मंत्री राहिलात. त्यावेळी सहकार विभागही आपल्याकडे होता. त्यावेळी आपण महाराष्ट्रातील साखर कारखान्यांसाठी काय केलं? सहकर क्षेत्रासाठी काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलं? मार्केटिंग नेता बनून फिरणे सोपे आहे. जमिनीवर राहून काम करणे गरजेचे असते असा टोलाही यावेळी शहा यांनी शरद पवारांना लगावला.
सहकार क्षेत्राला खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय दिला आहे. कृषी मंत्रालयापासून सहकार मंत्रालय वेगळं केलं. साखर कारखान्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणल्या. त्यामुळे साखर कारखान्यांची स्थिती सुधारली. फक्त नेता बनवून शेती सुधारत नाही असा टोलाही नंतर त्यांनी शरद पवारांना लगावला आहे. दरम्यान शिर्डी इथं झालेल्या भाजपच्या मेळाव्यातही अमित शहा यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली होती. शरद पवारांनी महाराष्ट्रात दगाबाजीचं राजकारण केलं. त्यांच्या या दगाबाजी राजकारणाला महाराष्ट्रातल्या जनतेने गाडलं अशी खरमरीत टीका शहा यांनी केली होती.
ट्रेंडिंग बातमी - Bhandara Blast: भंडाऱ्यात ऑर्डनन्स फॅक्टरीत भीषण स्फोट, 8 कामगारांचा मृत्यू
त्याला शरद पवारांनीही तेवढ्याच ताकदीने प्रत्युत्तर देत अमित शहांना लक्ष्य केलं होते. अमित शहा यांच्या टीकेकडे लक्ष देण्या इतपत ते मोठे नाहीत. ते गृहराज्यमंत्री असताना तडीपार झाले होते. अशा माणसाच्या टीकेकडे काय लक्ष द्यायचे. शिवाय त्या काळात मदतीसाठी ते बाळासाहेब ठाकरे आणि आपल्याकडे मदत मागत होते असा गौप्यस्फोटही त्यांनी केला होता. शिवाय आपण त्यांना जास्त महत्व देत नाही असा संदेशही पवारांनी या निमित्ताने दिला. ही टीका भाजपच्या राज्यातील नेत्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर पवारांना राज्यातल्या नेत्यांनी टीकेचे लक्ष करत त्यांच्या दाऊद बरोबरील संबधाचा उल्लेख केला होता.
दरम्यान आजच्या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी हजेरी लावली होती. ते अमित शहां बरोबर एकाच व्यासपिठावर दिसले. यावेळी अमित शहा यांनी छगन भुजबळांचा उल्लेख एनडीएचे जेष्ठ नेते असा केला. गेल्या काही दिवसापासून भुजबळ हे राष्ट्रवादीत नाराज आहेत. ते भाजपमध्ये जाण्याची चर्चा आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर अमित शहा यांच्या व्यासपिठावर भुजबळ दिसले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world