Who Will Be New Mayor Of Mumbai : कोण होईल मुंबईचा नवा महापौर? भाजपच्या 'या' 5 नगरसेवकांची दिवसरात्र चर्चा

मुंबई महापालिकेचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने आता मुंबईचा महापौर कोण होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे. अशातच भाजपच्या 5 नगसेवकांची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली आहे. 

जाहिरात
Read Time: 2 mins
Mumbai Mayor 2026 BJP Candidate List
मुंबई:

New Mayor Of BMC :   मुंबई महापालिका निवडणूक 2026 च्या निकालाने मुंबईच्या राजकारणात उलथापालथ केली आहे. जवळपास 3 दशकानंतर भारतीय जनता पक्षाने मुंबईत शिवसेनेचा बालेकिल्ल्यावर विजय मिळवला आहे. महायुतीने देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकेवर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता प्रश्न फक्त विजयाचा नाही,तर त्या महापौरपदाचा आहे,ज्याला शहराचा पहिला नागरिक म्हटलं जातं.निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठं विधान केलं होतं. मुंबईचा पुढचा महापौर ‘हिंदू आणि मराठी' असेल, असं फडणवीस म्हणाले होते.त्यामुळे मुंबई महापालिकेचा निकाल भाजपच्या बाजूने लागल्याने आता मुंबईचा महापौर कोण होणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरलं आहे. अशातच भाजपच्या 5 नगसेवकांची राजकीय वर्तुळात तुफान चर्चा रंगली आहे. 

1) तेजस्वी घोसाळकर

दहिसरमध्ये 10 हजारांहून जास्त मताधिक्य मिळवून तेजस्वी घोसाळकर भाजपच्या नव्या 'पोस्टर गर्ल'बनल्या आहेत. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला धोबीपढाड करत मोठा विजय मिळवला. तेजस्वी घोसाळकर शिवसेना (UBT)च्या माजी नगरसेविका आहेत. तर शिवसेनेचे दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत. तसच माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत. 

2) प्रकाश दरेकर

उत्तर-पश्चिम मुंबईत मराठी मतांची व्होट बँक असणाऱ्या प्रकाश दरेकर यांच्याही नावाची चर्चा आहे. ते विधान परिषदेत विरोधी पक्षनेते होते. ते भाजप दरेकर यांचे भाऊ आहेत. त्यांच्याकडे प्रशासनाचा अभ्यास आणि पक्ष संघटना मजबूत करण्याची धमक आहे. भाजपने अनुभवाचा विचार केला, तर दरेकर यांचा पारडं मजबूत आहे. 

नक्की वाचा >> BMC Mayor Election : 'Mumbai Boss' चा सस्पेन्स कधी संपणार? कशी असते महापौरपदाची लॉटरी सिस्टम? वाचा सर्व माहिती

3) प्रभाकर शिंदे 

मुंबई महापालिकेचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे यांच्याकडेही महापालिकेच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.नियम,समित्या आणि प्रशासनाच्या कामकाजाचा त्यांना चांगला अभ्यास आहे. ते मराठी चेहरा म्हणून लोकप्रिय तर आहेतच, पण त्यांना राजकीय आणि सामाजिक अनुभव सुद्धा आहे. त्यामुळे महापौरपदासाठी त्यांचाही विकल्प ठरू शकतो. 

Advertisement

4) मकरंद नार्वेकर 

दक्षिण मुंबईचे प्रभावशाली नेते मकरंद नार्वेकर सतत निवडणुका जिंकत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे ते भाऊ आहेत. त्यामुळे राजकीय पटलावर ते बडे नेते म्हणून ओळखले जातात. शहरातील मध्यम वर्गचा चेहरा म्हणूनही त्यांना ओळखलं जातं. अशातच भाजप त्यांना महापौरपदावर विराजमान करू शकतं.

नक्की वाचा >> BMC Election 2026 : निकालानंतर काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळली, बड्या नेत्याची गायकवाडांना हटवण्याची मागणी

5) राजश्री शिरवाडकर 

जर पक्षाने महिला महापौरच्या पर्यायाचा विचार केला, तर राजश्री शिरवाडकर यांचं नाव सर्वात पुढे असेल. एक निष्ठावंत आणि आक्रमक महिला नेत्या म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांच्या राजकारणातील अनुभव पाहता त्या सुद्धा महापौरपदाच्या मजबूत दावेदार आहेत. 

Advertisement