Fish in Mumbai : मुंबईच्या समुद्रातील मासे गायब का झाले? कारण समजल्यावर बसेल धक्का

अस्सल मुंबईकर असलेले कोळी बांधव सध्या त्रस्त आहेत. मुंबईच्या समुद्राजवळ मासे पकडण्यास त्यांना त्रास होतोय. मुंबईच्या समुद्रातील मासे का गायब झाले? याचं कारण धक्कादायक आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

मुंबई हे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील प्रमुख बंदर आहे. मुंबईला लाभलेल्या नैसर्गिक बंदराचा शहरातील विकासात मोठा वाटा आहे. सागरी मार्गानं होणाऱ्या व्यापाराचं मुंबई मोठं केंद्र आहे. त्याचबरोबर या समुद्रामुळे मुंबईत कोळी बांधवांची संस्कृती देखील रुजली आहे. अस्सल मुंबईकर असलेले कोळी बांधव सध्या त्रस्त आहेत. मुंबईच्या समुद्राजवळ मासे पकडण्यास त्यांना त्रास होतोय. मुंबईच्या समुद्रातील मासे का गायब झाले? याचं कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

काय आहे कारण?

उत्तर भारतामधील थंडीचा परिणाम तेथील नागरिकांवरच नाही तर समुद्रातील जीवांवर देखील होत आहे. मुंबईतील समुद्रातील  (Mumbai Sea) थंड पाण्यामुळे मासे (Fishes) दूर राहणं पसंत करत आहेत. त्यामुळे आता मासे अरबी समुद्रापीसून दूर जात आहेत. मुंबईच्या किनाऱ्यापासून दूरवर पसरलेल्या समुद्रात पसरलेल्या धुक्यामुळे मासे आता गरम पाण्याकडं जात आहेत. त्यामुळे मासेमार त्रस्त आहेत. त्यांना माशे पकडण्यासाठी 200 किलोमीटरपर्यंत दूर जावं लागत आहे. साधारण वर्सोवाच्या जवळपास जाळ्यात सापडणाऱ्या बॉम्बे डॉकला (मासा) पकडण्यासाठी आता पालघरच्या पुढे गुजरातमध्ये जावं लागत आहे. 

  • मुंबईतील समुद्रापासून दूर जात आहेत मासे
  • अरबी समुद्रातील धुक्यामुळे मासे दूर
  • पूर्व बाजूनं येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईत धुकं
  • धुक्यामुळे गरण पाण्याच्या शोधात मासे लांब
  • मासेमारांना मासे पकडण्यासाठी करावा लागतोय दूरचा प्रवास
  • माशांच्या बाजारातील किंमतीमध्ये मोठी वाढ

मुंबईच्या किनाऱ्यावर आढळणारे मासे जवळपास 200 किलोमीटर दूर पळाली आहेत. त्यामुळे मासेमारांसमोर नवं आव्हान उभं राहिलंय. त्यांना मासे पकडण्यासाठी दूरपर्यंत जावं लागत आहे. एका रिपोर्टनुसार मासेमारांना मासे पकडण्यासाठी जवळपास 180 किलोमीटर दूर जावं लागत आहेत. त्यांना किनाऱ्यावर परतण्यास अनेक दिवस लागत आहेत. 

( नक्की वाचा : New Year 2025 : 5 कामांनी करा नव्या वर्षाची सुरुवात, संपूर्ण वर्ष जाईल खास )
 

हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून वेगानं येणाऱ्या वाऱ्यांमुळे समुद्रातील धुकं वाढत आहे. त्यामुळे मासे पकडणाऱ्या जहाजांची दृश्यमानता देखील कमी झालीय. 

मच्छीमार असोसिएशनचे प्रमुख देवेंद्र टंडेल आणि राजहंस यांनी 'टाईम्स ऑफ इंडिया' शी बोलताना सांगितलं की, 'मासे पकडण्यासाठी ट्रॉलर्सना दूरवर जाण्यासाठी जास्त इंधन खर्च करावं लागत आहे. मासे गरम पाण्याकडं जात असल्यानं त्यांना पकडणं कमी होत आहे. याच कारणामुळे बाजारात माशांच्या किंमती देखील वाढल्या आहेत. 

Advertisement
Topics mentioned in this article