जाहिरात

New Year 2025 : 5 कामांनी करा नव्या वर्षाची सुरुवात, संपूर्ण वर्ष जाईल खास

How to start new year 2025 : नव्या वर्षाच्या निमित्तानं प्रत्येक जण काही तरी संकल्प करत असतो.  काही संकल्प हे आयुष्याला कलाटणी देणारे ठरु शकतात.

New Year 2025 : 5 कामांनी करा नव्या वर्षाची सुरुवात, संपूर्ण वर्ष जाईल खास
मुंबई:

How to start new year 2025 : नव्या वर्षाच्या निमित्तानं प्रत्येक जण काही तरी संकल्प करत असतो.  काही संकल्प हे आयुष्याला कलाटणी देणारे ठरु शकतात.  2025 च्या निमित्तानं आम्ही तुम्हाला असेच काही संकल्प सांगणार आहोत, ज्याची पहिल्या दिवसांपासून सुरुवात करुन तुम्ही 2025 हे वर्ष संस्मरणीय करु शकतो. 

नव्या वर्षाची सुरुवात कशी करणार?

तुम्ही नववर्षाची सुरुवात पूजा करुन करु शकता. या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करा. त्यानंतर देवाचं ध्यान करा. तुम्ही योगासनाच्या माध्यमातूनही नव्या वर्षाची सुरुवात करु शकता. त्यामुळे तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले राहील. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

त्यानंतर तुम्ही तुमच्या मित्राला तसंच नातेवाईकांना नव्या वर्षाच्या शुभेच्छा (New Year 2025) द्या. त्यानंतर नव्या वर्षासाठी काय करायचं याचा संकल्प करा. त्यानंतर नव्या वर्षाचा संकल्प तुमच्या डायरीत लिहा आणि खोलीच्या भिंतीवर चिकटवा. 

या दिवशी मोठ्यांचा आशिर्वाद नक्की घ्या. त्यामुळे तुमच्यासाठी संपूर्ण वर्ष सकारात्मक ठरेल. नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी लहान मुलांना बाहेर फिरायला नक्की न्या. त्यामुळे तुम्हाला चांगले वाटेल. 

वर्षाच्या पहिल्या दिवशी तुम्ही गरजूंना मदत करु शकता. त्यांना कपडे दान करु शकता. एखाद्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीनं त्यांना भेटून अन्य आवश्यक वस्तू देऊ शकता. तुम्ही वृद्धाश्रम तसंच विधवा आश्रमाला भेट देऊन त्यांच्याशी संवाद करु शकता. 

( नक्की वाचा : 2024 Dating Trends : यावर्षी तरुणांमध्ये खूप गाजले हे डेटिंग ट्रेंड्स, बदलली नात्यांची भाषा )
 

वर्षाच्या पहिल्या दिवशी पैशांची बचत करण्याचा संकल्प करा. त्यामुळे तुमची वर्षभरातील ओढाताण कमी होईल. वाईट सवयी सोडण्याचा संकल्पही नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी करु शकता. त्या माध्यमातून तुम्ही नव्या वर्षाची सुरुवात करु शकता.

स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. यामधील कोणत्याही मजकुराची अंमलबजावणी करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क याची जबाबदारी घेत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com