राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं (RSS) हे शताब्दी वर्ष आहे. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली रा.स्व.संघाची स्थापना केली. त्यानंतर गेल्या शंभर वर्षात ही जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी संघटना बनली आहे. भारतामधील सर्वच क्षेत्रात संघाचा प्रभाव आहे. विशेषत: देशातील प्रमुख सत्ताधारी पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीची (BJP) रा.स्व. संघ ही मातृसंघटना आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'NDTV मराठी' च्या वर्षपुर्तीबद्दल 'NDTV मराठी मंच' या विशेष कॉन्क्लेवचं आयोजन करण्यात आलं होतं. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर त्यामध्ये सहभागी झाले होते. आंबेकर यांनी यावेळी संघ परिवाराच्या वाटचालीचा आढावा घेतला. त्याचबरोबर संघाच्या कार्यपद्धतीबाबतच्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तरं दिली.
संघात महिला आहेत...
सुनील आंबेकर यांनी या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, 'अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे या वर्षी 58 लाख सदस्य आहेत. भारतीय मजदूर संघटना (BMS) ही देशातील सर्वात मोठी संघटना आहे. त्याचे सर्वाधिक सदस्य आहेत. मजदूर संघटना देशातील सर्वात मोठी संघटना बनली असेल तर त्यामध्ये कोण असेल? तुम्ही साधं गणित मांडलं तरी ही गोष्ट लक्षात येईल.
मला असं वाटतं की ही गोष्ट स्पष्ट आहे.संघाची रचना सोपी आहे. त्यामध्ये गुंतागुंत नाही. मैदानावर खेळ खेळणारं शाखा चालवणारं संघटन आहे. पुरुषांची शाखा चालवणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे. महिलांची शाखा राष्ट्रीय सेविका समितीकडून चालवली जाते.
( नक्की वाचा : NDTV Marathi Manch: भाजपावर RSS चा रिमोट कंट्रोल आहे? RSS च्या ज्येष्ठ अधिकाऱ्यानं सांगितली Inside Story )
त्याशिवाय पहिल्या दिवसापासून, स्वातंत्र्यानंतर जेव्हा सार्वजनिक संघटना सुरु झाल्या ज्या मैदानातील शाखा चालवत नाहीत, जे सार्वजनिक काम करतात. अभाविप ही पहिली संघटना, दुसरी बीएमस, सर्व संघटनेत स्त्री-पुरुष बरोबरीनं काम करतात.
मला असं वाटतं की संघाचं प्रत्येक घर हे फक्त पुरुषांचं नाही. पुरुष, महिला सर्व मिळून संघाचं घर आहे. संघाचं कार्य हे घरातून चालतं, असं आंबेकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.