
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (Rashtriya Swayamsevak Sangh) आणि भारतीय जनता पार्टीचे (Bharatiya Janata Party) संबंध कसे आहेत? हा सर्वत्र चर्चेचा विषय आहे. त्याबाबत अनेकांना कुतुहूल असतं. जगातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीवर संघाचा रिमोट कंट्रोल आहे, अशी टीका विरोधक करतात. संघ आणि भाजपाचे संबंध कसे आहेत? भाजपा अध्यक्षांच्या निवडीत संघाची भूमिका काय आहे? या सर्व विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर (Sunil Ambekar) यांनी NDTV मराठी शी बोलताना महत्त्वाची माहिती दिली आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
भाजपावर RSS चा रिमोट कंट्रोल आहे का?
भारतीय जनता पार्टीचा नवा अध्यक्ष कधी जाहीर होणार यावर सर्वांचं लक्ष आहे. भाजपा अध्यक्षपदाच्या निवडीत संघाचा काय सहभाग आहे, त्यावर आंबेकर यांना प्रश्न विचारला. त्यावर ते म्हणाले की, भाजपासह सर्व संघटनामध्ये संघामध्ये अनेक वर्ष काम करुन ती संस्था चालवत आहेत. भाजपाची अध्यक्ष निवडण्याची एक प्रक्रिया आहे. संघ आणि भाजपामध्ये राष्ट्रीय हिताच्या मुद्यावर औपचारिक तसंच अनौपचारिक चर्चा होते. अध्यक्षाच्या मुद्यावर त्यांना गरज वाटेल त्यावर चर्चा होते. पण, अध्यक्ष कुणाला निवडायचा तो त्यांचा अधिकार आहे.
भाजपावर संघाचा कोणताही रिमोट कंट्रोल नाही असं सांगताना आंबेकर म्हणाले की, संघ आणि संघ विचार पद्धतीमध्ये रिमोट कंट्रोल नाही. त्या संघटनेचे निर्णय त्याचे निर्णय घेतात. भाजपाला संघाची गरज लागली नाही या चर्चा अनावश्यक आहेत. समन्वयाचं काम उत्तम पद्धतीनं सुरु आहे.
( नक्की वाचा : NDTV Marathi Manch: 'पहलगाममधील हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना धडा शिकवा', RSS ची मोदी सरकारकडं मागणी )
महायुती सरकारला 100 दिवस पूर्ण झालेत. त्यासोबतच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची 100 वर्ष आणि एनडीटीव्ही मराठीला झालेल्या वर्षपूर्ती अशा विविध औचित्यांच्या निमित्ताने एनडीटीव्ही मराठी मंच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आंबेकर बोलत होते.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त संघाच्या शंभर वर्षाच्या कार्याचा आढावा घेतला. पुढील व्हिजन सांगितले. त्याचबरोबर संघासंबंधीचे वेगवेगळे गैरसमज यांना आंबेकर यांनी थेट उत्तरं दिली.
संघात दलित पदाधिकारी आहेत?
संघाचे काम ऑरगॅनिक आहे. ते राजकीय पक्षाचे काम नाही. त्यामुळे जाहिरात देऊन कुठल्या जातीचे आहेत हे सांगायची संघाची पद्धत नाही. संघामध्ये जातीच्या आधारावर कोणतीही सूची बनत नाही. त्यावर कोणताही निर्णय नाही. 140 कोटीपर्यंत पोहोचण्याचा संघाचा प्रयत्न आहे. संघाला राजकीय पक्षांसारखं सिद्ध करण्याची गरज नाही. संघात वेगवेगळ्या स्तरावर समाजातील सर्वांचा सहभाग आहे, असं आंबेकर यांनी स्पष्ट केलं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world