Silver Price Today In Mumbai : मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. पण गेल्या दोन-तीन दिवसांत चांदीच्या दराने उच्चांक गाढठा आहे. एरव्ही सोन्याचे दर गगनाला भिडत असल्याचं मार्केटमध्ये पाहायला मिळत होतं. पण आता चांदीच्या दरातही कमालीची वाढ झाल्याचं समोर आलं आहे. चांदीचे प्रति किलोग्रॅमेच दर जवळपास दोन लाख रुपयांवर पोहोचले आहेत. मुंबईच्या प्रसिद्ध झवेरी बाजारात एक ग्राहक चांदीच्या दराबाबत विचारयला गेला असता, चांदीचे दर दोन लाखांच्या पार गेल्याचं एका दुकानदाराने त्याला सांगितलं. आज बुधवारी चांदीची किंमत दोन लाखांच्या पार आहे.
चांदीच्या दरात का झाली मोठी वाढ?
मागील आठवड्यातच चांदीची किंमत दीड लाखांच्या पार गेली होती. गेल्या आठवड्यात शुक्रवारी चांदीचे प्रति किलोग्रॅमचे दर 1 लाख 64 हजार रुपयांवर पोहोचले होते. दोन-तीन दिवसांपासून चांदीच्या दरात मोठी वाढ होत आहे. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, बुधवारी बाजार सुरु झाल्यावर चांदीची किंमत 2 लाखांच्या पार गेली असून चांदीच्या दरात येत्या काही दिवसांत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण चांदीची जेव्हढी मागणी होत आहे, तेव्हढं सप्लाय होत नाहीय.
नक्की वाचा >> माधुरी हत्तीणीवर जीवापाड प्रेम! पण 'या' हत्तीवर लोकांनी फेकले दगड, Video व्हायरल होताच नेटकरी प्रचंड संतापले!
दुकानदारांनी ऑर्डर घेणं बंद केलं
अनेक दुकानदारांनी एनडीटीव्ही प्रॉफिटशी बोलताना म्हटलं की,ज्वेलरी बाजारात चांदीची किंमत 30 हजारांहून जास्त प्रिमियमवर सुर आहे. चांदीच्या दरात आणखी वाढ होणार असल्याचंही दुकानदारांचा म्हणणं आहे. यामुळे दुकानदारांनी सण-उत्सवादरम्यान चांदीच्या नवीन ऑर्डर घेणं बंद केलं आहे. एका दुकानदाराने एनडीटीव्ही प्रॉफिटशी बोलताना म्हटलं,जेव्हा आमच्याकडे एखादा ग्राहक येतो, तेव्हा तो किती प्रिमियम द्यायला तयार आहे, हे आम्हाला पाहावं लागतं. आम्हाला आमचं स्टॉकही बनवून ठेवावा लागतो. नाहीतर आमचं स्टोरेज संपू शकतं. आमचं स्टोरेज संपण्याआधी आम्ही जेवढ्या प्रमाणात चांदी विकतो, तेवढचं आम्हाला स्टोरेजमध्ये ठेवावं लागतं.
नक्की वाचा >> Viral : माजी पंतप्रधानांचा किसिंग सीन व्हायरल! यॉटवर सिंगर कॅटी पेरीसोबत झाले रोमॅन्टिक, जगभरात उडाली खळबळ!
चीन, ऑस्ट्रेलिया आणि तुर्कीसारख्या देशातही चांदीला जबरदस्त मागणी
एका दुकानदाराने सांगितलं की, सात ते दहा दिवसांसाठी सण-उत्सवाच्या सेलचा स्टॉक फक्त तीन दिवसांतच संपला. चांदीच्या खरेदीत जी वाढ होत आहे, ती फक्त भारतापुरतीच मर्यादाती नाही आहे. तर ऑस्ट्रेलिया, चीन, तुर्कीसारख्या देशातही याची मागणीत वाढ होत आहे. याच कारणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर याच्या डिलिव्हरीसाठी खूप वेळ लागत आहे.