जाहिरात

Viral : माजी पंतप्रधानांचा किसिंग सीन व्हायरल! यॉटवर सिंगर कॅटी पेरीसोबत झाले रोमॅन्टिक, जगभरात उडाली खळबळ!

Viral : माजी पंतप्रधानांचा किसिंग सीन व्हायरल! यॉटवर सिंगर कॅटी पेरीसोबत झाले रोमॅन्टिक, जगभरात उडाली खळबळ!
Justin Trudeau and Katy Perry Viral News
मुंबई:

Justin Trudeau and Katy Perry Viral News : स्ट्रोनॉमरचे सीईओ अँडी बायर्न आणि एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट यांचा कोल्ड प्ले कॉन्सर्टमध्ये रोमान्स करतानाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. या व्हिडीओ संपूर्ण जगभरात चर्चा रंगली होती. अशातच आता कॅनडाचे माजी प्रधानमंत्री जस्टिन टुडो आणि सिंगर कॅटी पेरी यांच्या बीच डेटिंगचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय. एका यॉटवर दोघांनीही रोमॅन्टिक रोमॅन्टिक पोज दिल्याचं फोटोंच्या माध्यमातून समोर आलं आहे. त्यामुळे या दोघांमध्ये अफेअर असल्याची चर्चा इंटरनेटवर रंगली आहे. व्हायरल फोटोत पाहू शकता की, टूडो हे शर्टलेस असून ते पेरीला किस करण्याचा प्रयत्न करतात. जस्टीन टूडो यांचा त्यांच्या पत्नीसोबत घटस्फोट झाल्याचं सांगितलं जात आहे. तसच त्यांना तीन मुलं आहेत.तर कॅटी पेरीही  रसेल ब्रांड यांच्यासोबत दोन वर्ष विवाहबंधनात होती. पण नंतर त्यांच्याही नात्यात दुरावा आल्याचं समजते. त्यानंतर तिने सिंगर ऑरलेंडो ब्लूमसोबतही ब्रेकअप केला होता. 

समुद्रात दोघांचही एका यॉटवर सुरू होतं रोमान्स अन्..

कॅटी पेरी आणि टुडोच्या या रोमॅन्टिक फोटोंमुळे त्यांच्यात प्रेमसंबंध असल्याचं लोकांचं म्हणणं आहे. दोघांनीही कॅलिफॉर्नियाच्या सांता बारबरा येथे एका यॉटवर रोमान्स केल्याचं व्हायरल फोटोंच्या माध्यमातून समोर आलं आहे. डेली मेलच्या एका रिपोर्ट्सनुसार, दोघेही समुद्रात एका यॉटमध्ये रोमॅन्टिक मूडमध्ये प्रेम व्यक्त करत होते. अनेक दिवसांपासून या दोघांच्या अफेअरबाबत उलटसुलट चर्चा रंगल्या होत्या. पण त्यांचे रोमान्स करतानाचे फोटो समोर आल्यानं एकच खळबळ उडाली आहे. 

नक्की वाचा >> रेल्वे प्रवाशांनो! घाई घाईत ट्रेन पकडताय? एस्केलेटरवर जाताना 'ही' चूक अजिबात करू नका, महिलेसोबत बघा काय घडलं..

सूत्रांच्या माहितीनुसार, मॉन्ट्रियलमध्ये डिनर डेटनंतर टूडो यांनी माध्यमांशी संवाद साधला नाही. पण त्यांच्या व्हायरल झालेल्या नव्या फोटोंमुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. व्हायरल फोटोत दोघेही खूप कंम्फरटेबल फिल करत असल्याचं पाहायला मिळत आहे. कॅटी पेरी काळ्या रंगाच्या स्विम सूटमध्ये असल्याचं फोटोत दिसत आहे. दोघेही एकमेकांना हग करून किस करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही फोटोत पाहायला मिळत आहे.

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, त्यांनी त्यांच्या यॉटला छोट्याशा पब्लिक प्लेस व्हेल-वॉचिंग बोटीजवळ थांबवलं आणि त्यानंतर दोघेही एकमेकांना किस करू लागले. याआधी हे दोघेही जुलै महिन्यात मॉन्ट्रियलमध्ये एका डिनर पार्टीत दिसले होते. त्यानंतर टूडो यांना कॅटी पेरीसोबत लाईफटाइम्स टूर मध्ये स्पॉट केलं गेलं होतं. कॅटी पेरीचं खासगी आयुष्य सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिने या वर्षी जून महिन्यातच सिंगर ऑरलैंडो ब्लूमसोबत सातवर्षानंतर नातं तोडलं होतं. तर टूडोने 18 वर्षांच्या लग्नानंतर ऑगस्ट 2023 मध्ये त्याची पत्नी सोफी ग्रेगोइरेसोबत घटस्फोट घेतल्याचं म्हटलं होतं. टूडो आणि सोफीला तीन मुलं आहेत.

नक्की वाचा >> Video : जे अक्षय कुमारला जमलं नाही..ते शाहरुखने केलं, 'लापता लेडीज' फेम नितांशी गोयल स्टेजवर पडता पडता वाचली

Listen to the latest songs, only on JioSaavn.com